Hungama 2 Review: 14 वर्षानंतर शिल्पा शेट्टीचे चित्रपटात पदार्पण, जाणून घ्या कसा आहे हंगामा 2

बी टाऊन
Updated Jul 24, 2021 | 11:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hungama 2 Review: बहुप्रतिक्षित चित्रपट हंगामा 2 हा कालच डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 14 वर्षानंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे.

Hungama 2 Review
14 वर्षानंतर शिल्पा शेट्टीचे चित्रपटात पदार्पण, जाणून घ्या कसा आहे हंगामा 2 

थोडं पण कामाचं

  • 23 जुलै रोजी Disney+Hotstarवर प्रदर्शित झाला चित्रपट
  • प्रियदर्शनने केले आहे शिल्पा शेट्टीच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन
  • पाहण्याआधी जाणून घ्या कसा आहे हंगामा 2 हा चित्रपट

Hungama 2 Review: बहुप्रतिक्षित चित्रपट (Awaited film) हंगामा 2 (Hungama 2) हा कालच डिस्नी प्लस हॉटस्टारवर (Disney+Hotstar) प्रदर्शित (release) झाला आहे. या चित्रपटाद्वारे बॉलीवुड अभिनेत्री (Bollywood actress), नृत्यांगना (dancer) शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) 14 वर्षानंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर (silver screen) पदार्पण (comeback) केले आहे. शिल्पा शेट्टी शेवटची 2007मध्ये ‘लाईफ इन मेट्रो’ आणि ‘अपने’ या चित्रपटांमध्ये मोठ्या पडद्यावर दिसली होती. शिल्पा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून तिचा पती (husband) राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉर्नफिल्मप्रकरणी (porn film case) अटक (arrest) झाल्यामुळे चर्चेत आहे. ज्यादिवशी तिचा हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच दिवशी गुन्हे शाखेने (crime branch) तिची 6 तास चौकशी (interrogation) केली.

राज कुंद्राला २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी

कोरोनाच्या संकटामुळे पुढे गेले चित्रपटाचे प्रदर्शन

दर्शक या चित्रपटाची बऱ्याच काळापासून वाट पाहात होते. या चित्रपटाचे काम 2020च्या जानेवारी महिन्यातच सुरू झाले होते. निर्मात्यांनी 14 ऑगस्ट 2020 रोजी चित्रपट प्रदर्शित करायचे ठरवले होते, मात्र कोरोनाच्या संकटामुळे चित्रपट तेव्हा प्रदर्शित होऊ शकला नाही. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरू झाले आणि 1 फेब्रुवारी 2021 रोजी पूर्ण झाले. या चित्रपटात शिल्पा शेट्टीशिवाय परेश रावल, प्रणिता सुभाष, जॉनी लीवर, राजपाल यादव, टीकू तलसानिया, मिजान जाफरी, आशुतोष राणा, अक्षय खन्‍ना हे कलाकार आहेत.

शिल्पासोबत दिग्दर्शन प्रियदर्शनचे पुनःपदार्पण

हा चित्रपट फक्त शिल्पा शेट्टीच्याच नाही, तर दिग्दर्शक प्रियदर्शनच्याही पुनःपदार्पणाचा चित्रपट आहे. प्रियदर्शनने बॉलीवुडमध्ये यापूर्वी 2013मध्ये रंगरेज या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हंगामा 2चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि यात विनोदाची भरमार असल्याचा अंदाज त्यावरून लावला जात होता. पण चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते की हा एक हलकाफुलका विनोदी चित्रपट आहे ज्यातून हंगामा काही उभा राहात नाही.

थोडक्यात जाणून घ्या चित्रपटाचे कथानक

या चित्रपटाची कथा ही कपूर घराण्याचा वारस असलेल्या आकाशचे (मीजान जाफरी) पिता आशुतोष राणापासून सुरू होते ज्यांचा त्याला राग येतो. आकाशचे घर विखुरले जात आहे, पण त्याला त्याचे काहीच वाटत नाही. वाणी (प्रणीता सुभाष) एका छोट्या मुलीसह त्यांच्या घरी येते आणि म्हणते की या मुलीचा पिता आकाश आहे. आकाश याला नकार देतो, पण कॉलेजमध्ये असताना ते दोघे एकत्र होते आणि त्यांचे अफेअर होते अशी कबुली देतो. तर दुसरीकडे वकील असलेले राधे (परेश रावल) हे वयस्कर आहेत आणि त्यांची पत्नी अंजली (शिल्‍पा शेट्टी) सुंदर आणि तरुण आहे. अंजली आणि प्रकाश यांची मैत्री होते. या दोघांचे बोलणे ऐकून राधे आपल्या पत्नीवर संशय घेऊ लागतो. राधेला वाटते की त्याची पत्नी अंजली आकाशपासून गर्भवती आहे. तो तिच्यावर लक्ष ठेवू लागतो आणि आकाशचा खून करण्याचा कट रचतो.

सुरुवातीपासून पकड घेण्यात अयशस्वी ठरतो चित्रपट

हंगामा 2 हा चित्रपट काही ठिकाणी काही संवादांमधून, घटनांमधून प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो, पण सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेण्यात मात्र अपयशी ठरतो. चित्रपटाचे कथानक अनेकदा रस्ता सोडून भरकटलेले दिसते. हंगामा 2चे संकलन आणखी सुस्पष्टरित्या व्हायला हवे होते हे जाणवत राहते. मात्र या चित्रपटात शिल्पा शेट्टीने आपला पूर्ण जलवा दाखवला आहे. ती पडद्यावर अतिशय सुंदर दिसते. तसेच परेश रावलही उठून दिसतात. आशुतोष राणा नायकाच्या वडिलांच्या भूमिकेत शोभून दिसतात. जॉनी लीवर, राजपाल यादव आणि अक्षय खन्नाही चित्रपटात चमकून जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी