PHOTOS: शिल्पा शेट्टीने सुरू केलं आलिशान हॉटेल, पाहा कसे आहे शिल्पाचे हॉटेल

बी टाऊन
Updated Dec 05, 2020 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपले आणखी एक स्वप्न पूर्ण केले आहे. शिल्पा शेट्टीने बांद्रा येथे एक नवे हॉटेल सुरू केले आहे. शिल्पाने तिच्या नव्या हॉटेलचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shilpa Shetty in her restaurant
(Photos) शिल्पा शेट्टीने चालू केले आपले नवे आलिशान हॉटेल, आतूनही अतिशय सुंदर आहे शिल्पाचे हॉटेल 

थोडं पण कामाचं

  • शिल्पा शेट्टीने सुरू केले नवे हॉटेल
  • प्रसिद्ध हॉटेल साखळी बॅस्टियनचा भाग आहे शिल्पाचे हॉटेल
  • शिल्पाचा पती राज कुंद्राही यावेळी उपस्थित

मुंबई: शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) तर आहेच, पण त्यासोबत एक यशस्वी उद्योजिकाही (successful businesswoman) आहे. फिटनेस व्हिडिओनंतर (fitness video) शिल्पा शेट्टीने नुकतेच एक नवे हॉटेल (new hotel) चालू केले आहे. तिचे हे हॉटेल प्रसिद्ध हॉटेल साखळी (famous hotel chain) बॅस्टियनचा (Bastian) भाग आहे. शिल्पा शेट्टीने आपले नवे हॉटेल मुंबईच्या (Mumbai) वांद्रेमध्ये (Bandra) सुरू केले आहे. बॅस्टियन हॉटेल बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजमध्ये (Bollywood celebrities) प्रचंड लोकप्रिय आहे. या हॉटेल उद्घाटनाच्या (inauguration) कार्यक्रमात शिल्पा शेट्टीने रितेश देशमुखलाही (Reteish Deshmukh) आमंत्रित केले.

रितेश आणि जेनेलिया देशमुखने दिली हॉटेलला भेट

सोशल मीडियामधून समोर आलेल्या फोटोजमध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या हॉटेलमध्ये खाण्याची मजा लुटताना दिसत आहेत. तसेच यात शिल्पा शेट्टीसह तिचा पती राज कुंद्राही उपस्थित असल्याचे दिसत आहे.

हॉटेलचे फोटो केले शेअर

शिल्पा शेट्टीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या नव्या हॉटेलच्या आतले काही फोटो शेअर केले आहेत. याशिवाय तिने आपल्या नव्या मेन्यू कार्डमध्ये अनेक नवे पदार्थही जोडले आहेत. तिने या फोटोंमध्ये या लज्जतदार पदार्थांचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंसह शिल्पा शेट्टीने लिहिले आहे, ‘काल रात्री साधारण ९ महिन्यांनंतर माझे पहिले नाईट आऊट आणि डिनर, बॅस्टियन वरळीमध्ये उत्तम जेवणाचा आनंद घेण्याची संधी, मौजमजा आणि मित्र.’

शिल्पाने चालू केले आहे फिटनेस स्टोअर

शिल्पा शेट्टीने याआधीही आपल्या योग आणि फिटनेस व्हिडिओंचा संग्रह प्रसिद्ध केला होता. तसेच शिल्पाच्या हॉटेलच्या शाखा फक्त भारतातच नाही, तर विदेशांमध्येही आहेत. शिल्पा शेट्टी लवकरच हंगामा 2 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात परेश रावल, प्रणीता सुभाष आणि मीनाज जाफरी मुख्य भूमिकांमध्ये आहेत. याचे दिग्दर्शन प्रियदर्शन करणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी