Shilpa Shetty होणाऱ्या सुनेला देणार २० कॅरेट डायमंडची अंगठी, मुलासाठी असेल ही अट

बी टाऊन
Updated Nov 11, 2020 | 13:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shilpa Shetty  Diamond Ring Daughter in law: शिल्पा शेट्टीचे म्हणणे आहे की ती आपला मुलगा वियान राज कुंद्राची होणारी पत्नी आणि आपल्या सुनेला सगळ्यात महागडी हिऱ्याची अंगठी देणार आहे. 

shilpa shetty
Shilpa Shetty होणाऱ्या सुनेला देणार २० कॅरेट डायमंडची अंगठी 

थोडं पण कामाचं

  • शिल्पा शेट्टीला नेहमीच ज्वेलरी कलेक्शन करायला आवडते.
  • तिच्याकडे एक सगळ्यात महागडी २० कॅरेटची हिऱ्याची अंगठी आहे
  • ही अंगठी शिल्पाला पती राज कुंद्राने २००९मध्ये लग्नादरम्यान दिली होती. 

मुंबई: शिल्पा शेट्टी कुंद्रा(shilpa shetty kundra) सोशल मीडियावर(social media) नेहमीच अॅक्टिव्ह असते. अनेकदा ही अभिनेत्री आपल्या फॅन्ससोबत पर्सनल तसेच प्रोफेशनल लाईफशी(professional life) संबंधित अपडेट शेअर करत असते. दरम्यान शिल्पा शेट्टी आपल्या नव्या मुलाखतीवरून चांगलीच चर्चेत आहे. वोगशी बोलताना शिल्पा शेट्टीने सांगितले की तिला नेहमीच ज्वेलरीचे कलेक्शन करणे खूप आवडते. तिच्याकडे सगळ्यात महागडी २० कॅरेटची हिऱ्याची अंगठी आहे जी तिला पती राज कुंद्राने २००९मध्ये लग्नादरम्यान गिफ्ट म्हणून दिली होती.

शिल्पाने यावेळी आपल्या कुटुंबाच्या वारश्याबाबतही सांगितले. याबाबत बोलताना शिल्पा म्हणाली, ती आपला मुलगा वियान राज कुंद्राची होणारी पत्नी आणि आपल्या सुनेला ही सगळ्यात महागडी हिऱ्याची अंगठी देणार आहे मात्र एका अटीवर...!

शिल्पा शेट्टी म्हणते की, ती नेहमी आपला मुलगा वियान राज कुंद्रालास सांगत असे ती त्याच्या होणाऱ्या पत्नीला तिच्यासाठी चांगले व्हावे लागेल.

५ कॅरेटचीअंगठी देत शिल्पा शेट्टीला राज कुंद्राने केले होते प्रपोज

शिल्पा शेट्टीने सांगितले होते की राज यांनी कशा प्रकारे तिला पॅरिसमध्ये पाच कॅरेटची हिऱ्याची अंगठी देत प्रपोज केले होते. तेव्हा मस्करीत शिल्पाने सांगितले की अधिक याची अपेक्षा करत होती. त्यानंतर राज कुंद्राने लग्नादरम्यान गिफ्ट म्हणून शिल्पा शेट्टीला तब्बल २० कॅरेटची अंगठी दिली होती. 

शिल्पा नेहमीच आपल्या कुटुंबियांबद्दल सांगत असते. ती नेहमीच इतर गोष्टींच्या तुलनेत आई बनण्याच्या जबाबदारीला अधिक महत्त्व देते. सोशल मीडिया पेजवरही शिल्पाने मॉम पॉईंटला हायलाईट केले आहे. शिल्पा आणि राज या वर्षाच्या सुरूवातीला आयव्हीएफच्या माध्यमातून दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत. शिल्पा आणि राज यांच्या घरी समीशा शेट्टी कुंद्राचा जन्म झाला आहे. 

शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसबाबत नेहमीच सजग असते. ती नेहमीच अनेकांना फिटनेस मंत्र देत असते. इतकंच नव्हे तर ती तिच्या फिटनेसचे व्हिडिओही सोशल मीडियावर अपलोड करत असते. यावर तिचा सर्वाधिक फोकस असतो तर आई झाल्यानंतरही आपला फिटनेस कसा कायम ठेवता येईल. ती नियमितपणे योगाही करते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी