Shilpa Shetty's husband Raj Kundra booked by ED for alleged money laundering in porn case, to be summoned soon : मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्रा याच्या विरोधात ईडीने एफआयआर दाखल करुन घेतली. एफआयआरमध्ये राज कुंद्रावर आर्थिक अफरातफरीचा आरोप ठेवण्यात आला आहे.
राज कुंद्रा याला २०२१ मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती. पॉर्न सिनेमाची निर्मिती करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप पोलिसांना राज कुंद्रावर केला होता. या प्रकरणात सुमारे दोन महिने जेलमध्ये घालविल्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये राज कुंद्रा जामिनावर जेलबाहेर आला. जेल बाहेर आल्यापासून राज कुंद्रा लो प्रोफाईल राहणे पसंत करत आहे. चुकून कधी कॅमेरा फ्रेममध्ये आला तरी राज कुंद्रा हुडी घातलेला किंवा तोंडाला मास्क लावलेला असाच कायम दिसतो. यामुळे राज कुंद्रा संदर्भातील चर्चा हळू हळू कमी झाली होती. पण ईडीने एफआयआर दाखल केल्यामुळे राज कुंद्रा पुन्हा चर्चेत आहे.
पॉर्न सिनेमाच्या निर्मितीच्या निमित्ताने आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप ठेवून ईडीने राज कुंद्रा विरोधात एफआयआर नोंदवून घेतला आहे. या प्रकरणात तपासाकरिता लवकरच ईडीकडून राज कुंद्राला हजर होण्यासाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.
राज कुंद्राच्या रॅकेटमध्ये काही विदेशातील व्यक्ती सहभागी असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी तपासाकरिता ईडीने एफआयआर नोंदविली आहे. ईडी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेला तपास आणि कारवाई याची माहिती घेणार आहे. यानंतर ईडी राज कुंद्रा प्रकरणी पुढील तपास करणार आहे.