अभिनेत्री कंगना आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा जुंपली! 

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Sep 13, 2020 | 17:36 IST

Kangana Ranaut on Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल करत अभिनेत्री कंगनावर पुन्हा निशाणा साधला. ज्याला कंगनाने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 

Kangana_Ranaut_sanjay raut
अभिनेत्री कंगना आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा जुंपली!   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा साधला शिवसेनेवर निशाणा
  • कंगना राणावतंच नवं ट्वीट
  • संजय राऊतांच्या टीकेला कंगनाचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली: अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने आज मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारच्या यांच्याशी कंगनाचा जो वाद सुरु आहे त्याच दरम्यान, तिने घेतलेली राज्यपालांची भेट ही चर्चेचा विषय ठरली. यावेळी कंगनाने राज्यपालांसमोर नेमकं काय म्हणणं मांडलं आणि राज्यपाल नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण याच दरम्यान, अभिनेत्री कंगना आणि शिवसेना (Shiv Sena) नेते यांच्यात चांगली जुंपली असल्याचं दिसून आलं आहे. कारण आज (रविवार) पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि अभिनेत्री कंगना राणावत यांनी एकमेकांवर टीका केली आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज असं (रविवार) म्हटले की, 'दुर्दैवाची बाब म्हणजे भाजप (BJP) मुंबईची (Mumbai) तुलना पाक-व्याप्त काश्मीरशी' (पीओके) करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिचं समर्थन करत आहे.' 

संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर कंगनाने देखील तात्काळ त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'हे दुर्दैवी आहे की, भाजप ड्रग आणि माफिया रॅकेटचा भांडाफोड करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं संरक्षण करत आहे. भाजपने याऐवजी शिवसेनेच्या गुंडांना माझा चेहरा खराब करु दिला पाहिजे, बलात्कार करु दिला पाहिजे किंवा सर्वांसमोर मला लिंच करुन दिलं पाहिजे. हो की नाही संजयजी? त्यांची हिंमतच कशी झाली की, ते एका तरुण महिलेची सुरक्षा करतात?, जी माफियांविरुद्ध उभी राहिली आहे!' असं ट्विट कंगनाने यावेळी केलं आहे. 

नेमकं प्रकरण काय आहे? 

कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती आणि त्यामुळेच ती भोवऱ्यात सापडली होती. 'मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?' असं तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होतं, ज्यामुळे तिला विविध क्षेत्रातील लोकांकडून कडाडून विरोध झाला होता.

कंगनाने असे वक्तव्य केले होते की, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिला मुंबईत असुरक्षित वाटते, ज्याच्या तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून उमटल्या आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एका लेखात म्हटले की जर तिला मुंबईत सुरक्षित वाटत नसेल तर तिने मुंबईत येऊ नये.

राऊत यांच्यावर प्रतिहल्ला करत कंगनाने म्हटले होते की, 'शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे आणि मला मुंबईत परत न येण्यास सांगितले आहे. मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?' कंगनाच्या या ट्विटनंतर खऱ्या अर्थाने हा संपूर्ण वाद सुरु झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी