Shivkumar Subramaniam: धक्कादायक! मुलाच्या निधनानंतर अवघ्या २ महिन्यातच शिवकुमार सुब्रमण्यम यांचे निधन 

बी टाऊन
Updated Apr 11, 2022 | 12:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shivkumar Subramaniam Passed Away | ११ एप्रिल म्हणजेच आठवड्याची सुरूवात बॉलिवूडसाठी एक धक्कादायक बातमी घेऊन आली आहे. बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेते आणि पटकथा लेखक शिवकुमार सुब्रमण्य यांचे सोमवारी सकाळी दु:खद निधन झाले आहे.

Shivkumar Subramaniam passed away just 2 months after the death of his son
शिवकुमार सुब्रमण्यम यांचे निधन   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ११ एप्रिल म्हणजेच आठवड्याची सुरूवात बॉलिवूडसाठी एक धक्कादायक बातमी घेऊन आली आहे.
  • शिवकुमार सुब्रमण्य यांचे सोमवारी सकाळी दु:खद निधन झाले.
  • काही दिवसांपूर्वीच सुब्रमण्य 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या चित्रपटात दिसले होते.

Shivkumar Subramaniam Passed Away | मुंबई : ११ एप्रिलची सकाळ म्हणजेच आठवड्याची सुरूवात बॉलिवूडसाठी एक धक्कादायक बातमी घेऊन आली आहे. बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेते आणि पटकथा लेखक शिवकुमार सुब्रमण्य (Shivkumar Subramaniam) यांचे सोमवारी सकाळी दु:खद निधन झाले आहे. सुब्रमण्य यांच्या निधनाच्या बातमीने सर्वाना धक्का बसला आहे कारण २ महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. दरम्यान आता सुब्रमण्य यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 'टू स्टेट' या चित्रपटात आपल्या दमदार भूमिकेने ऑनस्क्रीन भूमिका साकारणारे शिव सुब्रमण्यम यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन (passed away) झाले. आज म्हणजेच सोमवारी त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Shivkumar Subramaniam passed away just 2 months after the death of his son). 

अधिक वाचा : भाजपच्या 'या' आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

लक्षणीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच सुब्रमण्य 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) मुख्य भूमिकेत दिसली होती. शिवकुमार यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप उघड झालेले नाही. त्यांच्या निधनाची बातमी चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी दिली आहे. त्यात त्यांनी अंत्यसंस्काराबाबत देखील माहिती दिली. 

दरम्यान, हसंल मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार सुब्रमण्य यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच सोमवारी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मोक्षधाम हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

२ महिन्यापूर्वी मुलाचे निधन 

शिवकुमार सुब्रमण्य यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूडला एक धक्का बसला आहे. विविध माध्यमातून शोक व्यक्त केला जात आहे. अशातच चित्रपट निर्माता बिना सरवर यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.  त्यांनी ट्विटरवर अभिनेत्यांना श्रद्धांजली वाहिली आणि खुलासा केला की, दोन महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा जहानचा ब्रेन ट्यूमरमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांनी लिहले की, "अतिशय दु:खद बातमी. मुलगा जहानच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा जहान याला ब्रेन ट्युमर झाला होता. त्याच्या १६ व्या वाढदिवसापूर्वी त्यांचे निधन झाले होते."

या प्रसिध्द चित्रपटांमध्ये साकारली भूमिका 

शिवकुमार सुब्रमण्य यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. 'टू स्टेट' व्यतिरिक्त सुब्रमण्यम यांन 'तीन पत्ती', 'प्रहार' आणि राणी मुखर्जी स्टारर 'हिचकी'मध्येही दिसले. त्यांनी विधू विनोद चोप्राच्या 'परिंदा' आणि सुधीर मिश्रा यांच्या 'हजारों ख्वैशीं ऐसी' या चित्रपटाची पटकथा लिहिली. शिवकुमार यांनी 'मुक्ती बंधन' या टीव्ही शोमध्येही काम केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी