Sushmita Sen Workout: ४० वर्षांच्या सुष्मिता सेनचा जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ 

बी टाऊन
Updated Jul 23, 2019 | 23:03 IST

Sushmita Sen Workout: बॉलिवूड एक्ट्रेस सुष्मिता सेनं आपला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात सुष्मिता सेना इंटेंस वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडिओनं तिच्या फॅन्सला हैराण केलं आहे. 

Sushmita Sen
Sushmita Sen Workout: ४० वर्षांच्या सुष्मिता सेनचा जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सुष्मिता सेनचा वर्कआऊट करतानाचा जबरदस्त व्हिडिओ व्हायरल
  • बॉयफ्रेंडसोबत ही वर्कआऊट करताना व्हिडिओ करते शेअर
  • ४० व्या वर्षांतला वर्कआऊट करतानाचा जबरदस्त व्हिडिओ
  • सोशल मीडियावर सुष्मिता सेन बरीच अॅक्टिव्ह

बॉलिवूड एक्ट्रेस सुष्मिता सेन या दिवसात सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे. एकीकडे सुष्मिता आपला बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत असलेल्या रिलेशनशिपवरून चर्चेत आहे तर दुसरीकडे ती आपल्या वर्कआऊटवरूनही हायलाईटमध्ये आहे. सुष्मिता नेहमी वर्कआऊट करताना आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

आताच सुष्मितानं आपला एक आणखी व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहेत. ज्यात सुष्मिता जिमनास्टिक रिंग्ससोबत इंटेस वर्कआऊट करताना दिसतेय. तिचा हा व्हिडिओ तिच्या फॅन्ससाठी एकदम हैराण करणार आहे. हा व्हिडिओ बघून सगळेच जण सुष्मिताचं कौतुक करतायत. काही फॅन्सचं म्हणणं आहे की, सुष्मिता माझ्यासाठी प्रेरणा आहे तर काहीचं म्हणणं आहे की, सुष्मितानं खूप चांगल्याप्रकारे वर्कआऊट केला आहे. 

आधीही शेअर केले वर्कआऊटचे व्हिडिओ 

ही पहिली वेळ नाही आहे की सुष्मिता सेननं आपल्या वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला. याआधी सुष्मितानं बरेच वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर केले. एवढंच काय तर सुष्मितानं बॉयफ्रेंड रोहमनसोबतही वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ शेअर केलेत. सुष्मिता जास्तकरू जिमनास्टिक रिंग्ससोबत वर्कआऊट करताना दिसते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

बॉयफ्रेंडनं किस करताना शेअर केला होता व्हिडिओ 

रोहमनं सुष्मिता सोबत एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात रोहमन सुष्मिताच्या गालावर किस करताना दिसतोय. हा फोटो शेअर करताना रोहमननं लिहिलं की, मला हिच्या डिंपल्सवर प्रेम आहे. आय लव यू. सुष्मितानं सुद्धा हा फोटो रिपोप्ट करून लिहिलं की, नेहमी हसण्यासाठीचं आणखी एक कारण. आय लव यू. 

काही दिवसांपूर्वी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर सुष्मितानं एक फोटो शेअर केला. फोटोत ती आपला बॉयफ्रेंड रोहमनसोबत दिसत आहे. हा फोटो जिममधील आहे. यात सुष्मिता ब्लॅक स्पोर्ट्स ब्रा आणि टाईट्समध्य दिसत आहे. तर रोहमन व्हाईट वेस्ट आणि ब्लॅक टाईट्समध्ये पोज देत आहे. इतकंच नव्हे तर सुष्मिताने या फोटोसोबत कॅप्शनही दिले आहे रोहमन आय लव्ह यू. यावर रोहमनने कमेंट करताना म्हटले, And she is mine' तसेच यासोबत हार्ट इमोजीही टाकला आहे.

sushmita sen

सुष्मिता एक सिंगल मदर आहे. रोहमन सुष्मिताने दत्तक घेतलेल्या दोन मुली रेने आणि अलिशा यांच्या खूप जवळ आहे. रोहमनसोबतच्या नात्याबाबत सुष्मिता नेहमी खुलेपणाने चर्चा करत असते. दोघेही सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करण्यासोबत लव्हीडव्ही कमेंटही करत असतात.  कामाच्या बाबत बोलायचे झाल्यास सुष्मिता बऱ्याच काळापासून सिनेमांपासून दूर आहे. ती अखेरची २०१५मध्ये आलेल्या निरबाक या सिनेमात दिसली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Sushmita Sen Workout: ४० वर्षांच्या सुष्मिता सेनचा जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ  Description: Sushmita Sen Workout: बॉलिवूड एक्ट्रेस सुष्मिता सेनं आपला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात सुष्मिता सेना इंटेंस वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडिओनं तिच्या फॅन्सला हैराण केलं आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...