Salman Khan And Somy Ali: भाईजानला एक्स गर्लफ्रेंडने दिली धमकी; महिलांचे शोषण करणाऱ्यांचा पर्दाफाश होणार

Salman Khan And Somy Ali । सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. पण अलीकडेच तिने अशी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यानंतर बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला आहे.

Shocking post by Salman Khan's ex-girlfriend Somy Ali
भाईजानला एक्स गर्लफ्रेंडने दिली धमकी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली सध्या बॉलिवूडपासून दूर आहे.
  • सोमी अलीच्या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
  • सोमीने सलमानवर गंभीर आरोप केल्याची चर्चा आहे.

Salman Khan And Somy Ali । मुंबई : सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अली (Somi Ali) सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. पण अलीकडेच तिने अशी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यानंतर बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. अलीकडेच तिने सलमान खानसोबतच्या नात्याबद्दल सांगितले. ९० च्या दशकात त्यांचे प्रेम फुलले, परंतु नंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले कारण दोघेही त्या नात्यामध्ये खुश नव्हते. अलीकडेच सोमीने ऐश्वर्या राय बच्चन हिला टॅग करून (Aishwarya Rai Bachchan) पोस्ट शेअर (Somi Ali a shocking post) केली आहे, ज्यामध्ये तिने बॉलिवूडमधील महिलांचे शोषण करणाऱ्यांना उघडपणे धमकी दिली आहे. (Shocking post by Salman Khan's ex-girlfriend Somy Ali).

अधिक वाचा : सरकारनं केली कमी केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई,डीए वाढला

सोमी अलीने तिच्या पोस्टमध्ये ज्याप्रकारे ऐश्वर्या राय बच्चनचे नाव घेतले आहे, त्यावरून अशी चर्चा रंगली आहे की तिने ही पोस्ट सलमान खानसाठी केली आहे की नाही. कारण सलमानने दारूच्या नशेत ऐश्वर्याला मारहाण केल्याच्या बातम्या मध्यंतरी व्हायरल झाल्या होत्या.

सोमी अलीने केली धक्कादायक पोस्ट 

सोमी अलीने तिच्या ताज्या पोस्टमध्ये सलमान खान आणि भाग्यश्रीचा चित्रपट असलेल्या 'मैने प्यार किया' मधील स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटसोबतच सोमीने लिहिले की, "बॉलीवूडचे हार्वे वेनस्टीन, एक दिवस तुमचाही पर्दाफाश होईल, तुम्ही ज्या महिलांवर अत्याचार केलेत ते एक दिवस बाहेर येतील आणि त्याच त्यांचे सत्य सांगतील, जसे ऐश्वर्या राय बच्चनने केले होते."

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल 

somy ali post

सोमी अलीच्या या पोस्टने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते आणि नेहमी तिचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. 

कोण आहे हार्वे वेनस्टीन? 

हार्वे वेनस्टीन हे एक हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. हार्वे यांच्यावर अनेक महिला आणि अभिनेत्रींनी बलात्कार, अत्याचार, लैंगिक शोषण आणि धमक्या दिल्याचा आरोप केला होता. यामध्ये केट ब्लँकेट, लिसा कॅम्पबेल, अवा ग्रीन, अँजेलिना जोली या प्रसिद्ध अभिनेत्रींचा देखील समावेश होता. त्याच्या वाईट कृत्यांसाठी न्यायालयाने त्यांना २३ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी