सुशांतसिंगचा झाला होता खून? पोस्टमॉर्टम करणाऱ्याचा धक्कादायक खुलासा.

बी टाऊन
Updated Dec 26, 2022 | 20:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shocking update about Bollywood actor Sushant Singh death mystery : बॉलीवूड अभिनेता सुशांतचे शवविच्छेदन केलेल्या रूपकुमार शहांचा धक्कादायक खुलासा.

Sushant Singh death mystery
सुशांतसिंगचा झाला होता खून?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आत्महत्या नसून खून!
  • मृत्यूमागे उद्धव ठाकरेंचा हात, सुशांतच्या वडिलांचा आरोप
  • ऑटोप्सी केलेल्या व्यक्तिचा खुलासा

Shocking update about Bollywood actor Sushant Singh death mystery : प्रेक्षकांचा लाडका बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचे २०२० मध्ये त्याच्या वांद्रे येथील घरात (रेंटल अपार्टमेंट / भाड्याचे घर) १४ जूनला निधन झाले होते.  या दुर्दैवी घटनेला दोन वर्षे होऊन गेली आहेत. तरीही त्याच्या आत्महत्येचे गूढ अजूनही कमी झालेले नाही. त्याच्या मृत्यूला आत्महत्या म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हा पासून आतापर्यंत अभिनेत्याचे चाहते, त्याचे कुटुंबिय तो मृत्यू आत्महत्या नसून खून होता असा दावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर सुशांतची ऑटोप्सी करणाऱ्या व्यक्तीने झोप उडवून टाकणारा खुलासा केला आहे. त्याच्या दाव्यानुसार अभिनेत्याने आत्महत्या केलेली नाही. त्याला निःसंशयपणे मारण्यात आले होते. 

सुशांतचे शवविच्छेदन केलेले रूपकुमार शहा माध्यमांशी बोलताना म्हणाले की,

"सुशांतसिंग राजपूतचे निधन झालेले त्या दिवशी कूपर हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टम विभागात एकूण पाच मृतदेह आले होते. त्यांपैकी एक मृतदेह वीवीआयपीचा होता.  जेव्हा आम्ही पोस्ट मॉर्टमला सुरवात केली तेव्हा आम्हाला समजले की तो वीवीआयपी सुशांत होता आणि त्याच्या शरीरावर अनेक व्रण होते आणि दोन - तीन व्रण मानेजवळ सुद्धा होते. पॉस्टमॉर्टमचे चित्रण करणे आवश्यक होते मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फक्त फोटो काढण्याची सूचना केली होती. त्यामुळे मिळालेल्या आदेशाचे मी पालन केले होते."
"जेव्हा सुशांतचा मृतदेह मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा तातडीने वरिष्ठांना कळवले की, ही आत्महत्या नसून हा खून आहे. मी त्यांना हे ही सांगितले की आपण नियमांचे पालन करून कारवाई केली पाहिजे. तरीही ते म्हणाले की, लवकरात लवकर मृतदेहाचे फोटो काढून तो पोलिसांच्या स्वाधीन करा."

प्रसिद्धीच्या शिखरावर असण्याऱ्या सुशांत त्याच्या बांद्रा येथील घरात २०२० मध्ये मृतावस्थेत सापडला होता. अगदी मुंबई पोलिसांपासून, ईडी, सीबीआय, एनसीबी - यांनी नानाविध पद्धतींनी या केसची तपासणी केली होती. अंती त्यांनी हाच निष्कर्ष काढला की अभिनेत्याचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला.  

अभिनेत्याचे वडील केके सिंग, नुकत्याच एका मुलाखतीत आरोप केला की, सुशांतच्या मृत्यूमागे उद्धव ठाकरेंचा हात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी