ब्रेकिंग न्यूज: ३१ मार्चपर्यंत टीव्ही मालिका, चित्रपटांचं शूटिंग बंद राहणार!

बी टाऊन
Updated Mar 15, 2020 | 20:10 IST

कोरोना व्हायरसमुळे चित्रपट आणि टीव्ही मालिका यांचं शूटिंग ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. तसा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.

shootings for all entertainment formats to stop till 31 march 2020
ब्रेकिंग न्यूज: ३१ मार्चपर्यंत टीव्ही मालिका, चित्रपटांचं शूटिंग बंद राहणार!  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: कोरोना व्हायरसचा फटका सर्वच व्यवसाय आणि उद्योगधंद्यांना बसला आहे. आता याच कोरोनाचा फटका मनोरंजन क्षेत्राला देखील बसणार आहे. कारण १९ मार्चपासून ते ३१ मार्चपर्यंत चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरीज यांचं शूटिंग बंद राहणार आहे. याबाबतच निर्णय इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन (इम्पा) कडून घेण्यात आला आहे. 

राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह हे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश याआधीच सरकारने दिले आहेत. त्यानंतर आता मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं शूटिंग देखील बंद राहणार आहे. भारत सरकारने वैद्यकीय आणीबाणी जारी केल्यानंतर इम्पाने हा निर्णय घेतला आहे. 

इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन (इम्पा), फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’च्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याविषयी एक पत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे. या पत्रकात असं म्हटलं आहे की, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत आहोत. 

दरम्यान, मालिका आणि चित्रपटांचं शूटिंग थांबविण्यात आल्याने आता काही दिवस मनोरंजन क्षेत्रात देखील सगळीकडे शुकशुकाट असणार आहे. दरम्यान, ३० मार्चपर्यंत शूटिंग थांबविण्यात आलं आहे. मात्र, त्यापुढे शूटिंग सुरु होणार की नाही याबाबतचा निर्णय पुढील परिस्थिती पाहून घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

जगभरात दीड लाख जणांना कोरोनाची लागण

दरम्यान, जगभरात लागण झालेल्या लोकांची संख्या ही १५०,००० च्या वर गेली आहे. आतापर्यंत १३७ देशांमध्ये ५५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत १०७ जणांना संसर्ग झाला आहे. 

मुंबईत जमावबंदी लागू 

राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. आता राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही ३२ वर पोहचली आहे. त्यामुळे याचं गांभीर्य ओळखून मुंबईत कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आलं आहे. आज (रविवार) औरंगबादमध्ये एका ५९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ३२ वर पोहचली आहे. मुंबईत सुद्धा ५ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने आता मुंबई पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...