जाणून घ्या प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल कुणावर एवढी चिडली

बी टाऊन
Updated May 16, 2019 | 16:04 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचा आवाज जितका सुंदर आणि मधूर आहे. तिलाही तितकंच मधूर समजलं जातं. मात्र सध्या श्रेया चिडलेली आहे. श्रेया इतकी चिडली की तिनं आपला राग ट्विटरवरून व्यक्त केला. पण ती कुणावर आणि का चिडली

Shreya Ghoshal
श्रेया घोषाल 

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आपल्या एका म्यूजिकल कॉन्सर्टसाठी सिंगापूरला गेली होती. मात्र तिकडून आल्यानंतर तिनं ट्विटरवरून आपला राग व्यक्त केलाय. श्रेयानं व्यक्त केलेला हा राग सिंगापूर एअरलाईन्सबद्दलचा आहे. श्रेयानं ट्विट करत लिहिलंय, ‘मला वाटतं की, म्यूझिशियन्स आणि ज्यांच्याकडे संगीताची उपकरणं आहेत अशांनी प्रवासच करू नये, असं सिंगापूर एअरलाईन्सला वाटतंय. असो त्यांनी मला ही शिकवण दिल्याबद्दल धन्यवाद'. श्रेया घोषालच्या या ट्विटवरून हे नक्की समजतंय, की सिंगापूर एअरलाईन्समधून प्रवास करताना नक्की काही तरी घडलंय. बहुतेक ती फ्लाईटमध्ये म्यूझिक इंस्ट्रूमेंट घेऊन जात असेल आणि तिला ते सोबत घेण्यास नकार दिला गेला असेल. कदाचित त्यामुळंच श्रेयानं अशाप्रकारे आपला राग व्यक्त केला असेल.

श्रेया घोषालनं केलेल्या ट्विटनंतर एअयरलाईन्सनं तिची क्षमा मागितली आहे. एअरलाईन्सनं ट्विटकरून श्रेयाला तसा रिप्लाय केला आहे. एअरलाईन्सनं म्हटलं, 'हॅलो श्रेया, जे झालं त्याबाबतीत आम्ही आपली क्षमा मागतो. आपल्याला नक्की काय त्रास झाला ते विस्तृतपणे सांगू शकता का आणि त्याचबरोबर आमच्या सहकाऱ्यांनी शेवटी आपल्याला काय सल्ला दिला? हे ही सांगाल. थँक्यू...'. श्रेया घोषालनं सध्यातरी या ट्विटवर अजून कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाहीय.

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

✈️

A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal) on

 

श्रेया घोषाल बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिकांपैकी एक आहे. तिच्या गाण्यानं अवघं बॉलिवूड डोलतं. तिनं अनेक फिल्म्समध्ये गाणी गाऊन आपल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. तसंच ती रिऍलटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम करते.

श्रेयानं आपल्या करिअरची सुरूवात खरं पाहता १९९६ साली सा रे गा मा पा या रिऍलिटी शो जिंकून खूप लहान वयामध्ये केली. तिनं वयाच्या चार वर्षापासूनच आपल्या आईबरोबर हार्मोनिअमवर गाणं शिकायला सुरूवात केली.

श्रेया सोशल मीडियावर सुपर एक्टिव्ह आहे. ती आपल्या फॅन्ससाठी नेहमी वेगवेगळ्या पोस्ट टाकत असते. तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं तर, साल २०१५ मध्ये शिलादित्य मुखोपाध्यायबरोबर श्रेयानं लग्न केलं. शिलादित्यची श्रेयाशी ओळख स्कूल रियूनियनमध्ये झाली होती. सुमारे १० वर्ष ते एकमेकांना डेट करत होते आणि अखेर त्यांनी लग्न केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
जाणून घ्या प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल कुणावर एवढी चिडली Description: प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचा आवाज जितका सुंदर आणि मधूर आहे. तिलाही तितकंच मधूर समजलं जातं. मात्र सध्या श्रेया चिडलेली आहे. श्रेया इतकी चिडली की तिनं आपला राग ट्विटरवरून व्यक्त केला. पण ती कुणावर आणि का चिडली
Loading...
Loading...
Loading...