राज कपूर यांची मुलगी आणि श्वेता बच्चन यांची सासू रितू नंदा यांचे निधन, नितू सिंग यांची भावनिक पोस्ट 

रितू नंदा यांच्या निधनानंतर नितू सिंग-कपूर यांनी भावनिक श्रद्धांजली व्यक्त केली आहे. 

shweta bachchans mother in law ritu nanda passes away at 71 neetu kapoor shares emotional note entertainment news in marathi
राज कपूर यांची मुलगी आणि श्वेता बच्चन यांची सासू रितू नंदा यांचे निधन, नितू सिंग यांची भावनिक पोस्ट   |  फोटो सौजन्य: Instagram

नवी दिल्ली  :  शो मॅन राज कपूर यांची ज्येष्ठ कन्या आणि श्वेता बच्चन यांची सासू रितू कपूर नंदा यांचे आज निधन झाले. वयाच्या ७१ वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्या अनेक वर्षांपासून कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने त्रस्त होत्या. त्यांचा अंत्यविधी दिल्लीती लोधी रोड येथील स्मशानभूमीत आज दुपारी १.३० मिनिटांनी होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. 

नितू सिंग कपूर यांनी इन्स्टाग्रामवर रितू नंदा यांच्या निधनाची बातमी एका भावनिक पोस्टद्वारे शेअर केली आहे. या फोटोत रितू नंदा आणि नितू कपूर आहेत. नितू सिंग लिहितात. माझ्या सर्वात आवडत्या तुमच्या आत्म्याला शांती लाभो. रिधिमा कपूर सहानी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपली आत्या रितू नंदा यांना भावनिक श्रद्धांजली दिली आहे. सर्वात दयाळू आणि सभ्य व्यक्ती म्हणून तुम्ही माझ्या जीवनात होत्या. अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही.   RIP bua #missyoualways"

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My dearest may your soul Rest In Peace ???

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

To the kindest most gentle person I‘ve ever met - They don’t make them like you anymore - RIP bua #missyoualways❤️??

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial) on

 

रितू नंदा यांचे लग्न सुप्रसिद्ध उद्योगपती आणि एस्कॉर्ट ग्रुप चेअरमन राजन नंदा यांच्याशी झाले होते. त्याचे निधन २०१८ मध्ये झाले. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिचा विवाह रितू नंदा यांचा मुलगा निखिल नंदा यांच्याशी झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी