42 वर्षीय Shweta Tiwari चा सेक्सी साडी लूक पाहून चाहते म्हणाले, 'तू कधी म्हातारी होणार...'

बी टाऊन
Updated Mar 26, 2023 | 17:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shweta Tiwari Photos: 22 वर्षांपूर्वी टीव्हीवर 'कसौटी जिंदगी की' मालिका सुरू होती. यात श्वेता तिवारीने 'प्रेरणा'ची भूमिका साकारली होती. तेव्हापासून आजतागायत ती चाहत्यांमध्ये 'प्रेरणा' म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे वयाच्या 42 व्या वर्षीही ती पूर्वीसारखीच तरूण आणि हॉट दिसते.

Shweta Tiwari gorgeous holographic saree look
42 वर्षीय Shweta Tiwari चा सेक्सी साडी लूक पाहून चाहते म्हणाले, 'तू कधी म्हातारी होणार...'   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • श्वेताने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत
  • 42 व्या वर्षीही ती पूर्वीसारखीच तरूण आणि हॉट दिसते.
  • श्वेताच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे.

Shweta Tiwari Saree Look: 22 वर्षांपूर्वी टीव्हीवर 'कसौटी जिंदगी की' मालिका सुरू होती. यात श्वेता तिवारीने 'प्रेरणा'ची भूमिका साकारली होती. तेव्हापासून आजतागायत ती चाहत्यांमध्ये 'प्रेरणा' म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे वयाच्या 42 व्या वर्षीही ती पूर्वीसारखीच तरूण आणि हॉट दिसते. वाढत्या वयासोबत श्वेताचे सौंदर्यही दिवसेंदिवस वाढत आहे आणि हे आम्ही म्हणत नसून तिचे चाहते स्वत: बोलत आहेत. अभिनेत्रीने नुकतेच साडी नेसलेले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आणि या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे. (Shweta Tiwari gorgeous holographic saree look)

श्वेताने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत

Shweta Tiwari ने काही दिवसांपूर्वी बिकिनी घातलेले तिचे काही फोटो शेअर केले होते, ज्यामुळे ती यूजर्सच्या बुकमार्क लिस्टमध्ये होती. मात्र, आता तिने साडीतील फोटो शेअर केल्यावर आणि चाहते तिच्या या लूकवर फिदा झाले आहेत. एका चाहत्याने मजेशीर कमेंट केली, "कसौटी पाहताना आम्ही म्हातारे झालो, तू कधी होणार. #बालपणीचा क्रश, #तारुण्याचाक्रश, #म्हातारपणाचाक्रश." आणखी एका चाहत्याने लिहिले, 'एक तिवारी सब पर भारी'.

बिकिनीमध्ये फोटो पोस्ट केले होते

याआधी श्वेता तिवारीने आपल्या मुलासोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतानाचे काही फोटो शेअर केले होते. तिने बिकिनी घातली होती, ज्यावर लोकांनी तिला तिच्या ब्युटी आणि हॉट फिगरमागचे सिक्रेट विचारले होते. एका यूजरने, 'मॅडम, तुमच्या हॉट फिगरचे रहस्य शेअर कराल का... तुम्ही असे कोणते अमृत प्यायले आहे की तुम्हाला म्हातारपण येत नाही', अशी कमेंट केली होती. श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती जवळजवळ दररोज रील बनवते आणि पोस्ट करते. तिचे सुंदर फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी