गायक अरिजीत सिंगने एकत्र विकत घेतले जार फ्लॅट, जाणून घ्या किंमत 

 गायक अरिजीत सिंग एक पुन्हा चर्चेत आला आहे. बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणे गायलेल्या अरिजीत सिंगने एकत्र चार फ्लॅट खरेदी केले आहेत. हे सर्व फ्लॅट्स त्याने मुंबईतील वर्सोवा भागात खरेदी केले आहेत.

 singer arijit singh bought four flats in mumbai worth rs 9 crore bollywood news in marathi tent 1
 गायक अरिजीत सिंगने एकत्र विकत घेतले जार फ्लॅट, जाणून घ्या किंमत  

 मुंबई :  गायक अरिजीत सिंग एक पुन्हा चर्चेत आला आहे. बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणे गायलेल्या अरिजीत सिंगने एकत्र चार फ्लॅट खरेदी केले आहेत. हे सर्व फ्लॅट्स त्याने मुंबईतील वर्सोवा भागात खरेदी केले आहेत. सर्व फ्लॅट एकाच इमारतीत आहेत. सिंगरने हे फ्लॅट सात बंगला रोड येथील सविता कोऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये घेतले आहेत. 
 
 जीबीज डॉट कॉमने दिलेल्या बातमीनुसार, अरिजीत सिंगने या सर्व फ्लॅट रजिस्टर २२ जानेवारीला केले आहेत. हे चार प्लॅट चौथ्या फ्लोअरवर आहेत. या सर्व फ्लॅटची किंमतही समोर आली आहे. 
 
 रिपोर्टनुसार पहिला फ्लॅट ३२ स्वेअर मीटरचा असून त्याची किंमत १ कोटी ८० लाख रुपये आहे. दुसरा फ्लॅट ७० स्वेअर मीटरचा आहे. त्याची किंमत २.२० कोटी आहे. तिसरा फ्लॅट ८० स्वेअर मीटराचा आहे. त्याची किंमत २ कोटी ६० लाख रुपये आहे. चौथा फ्लॅट ७० स्वेअर मीटरचा असून त्याची किंमत २ कोटी ५० लाख रुपये आहे. 
 
 त्यामुळे अरिजीत सिंगच्या चारही फ्लॅटची एकूण किंमत ९ कोटींच्या आसपास आहे. अरिजीत सिंग हा पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादचा राहणारा आहे. आपल्या करिअरची सुरूवात २००५ मध्ये सिंगिग रिअॅलिटी शो गुरूकुलमधून झाली आहे. या दरम्यान दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांची नजर अरिजीत याच्यावर पडली. त्यानंतर त्यांनी अरिजीतला सांवरिया या चित्रपटातील 'यू शबनमी' गाण्यासाठी संधी दिली. 


 
 त्यानंतर त्याचा यशाची वाटचाल सुरू केली. आज अरिजीत बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. त्याने हिंदी शिवाय दुसऱ्या अनेक भाषांमध्ये गाणे गायली आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी