Kanika Kapoor Coronavirus: दुसऱ्यांदाही सिंगर कनिका कपूरचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

बी टाऊन
Updated Mar 24, 2020 | 14:27 IST

कनिका कपूर (Kanika Kapoor) ची सोमवारी पुन्हा एकदा कोरोना Coronavirus)ची टेस्ट केली आहे आणि यावेळी देखील तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे.

Kanika Kapoor
कनिका कपूरचा दुसरा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह  |  फोटो सौजन्य: Instagram

नवी दिल्लीः  बॉलिवूडची गायक कनिका कपूर हिने सोशल मीडियावर खुलासा केला की तिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यानंतर तिच्यावर लखनऊमधील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता पुन्हा एकदा सोमवारी कनिकाची कोरोनाची टेस्ट केली गेली आणि यावेळीही ती कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कनिकाच्या कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की, तिचा पहिला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह नव्हता आणि तो अहवाल चुकीचा होता.  

त्यानंतर पुन्हा एकदा तिची टेस्ट करण्यात आली आणि तिचा दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कनिका 9 मार्चला लंडनहून भारतात परतली होती. त्यानंतर ती जवळपास चार पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. पोलीस त्या सर्व लोकांची चौकशी करत आहे. या दरम्यान कनिका संपर्कात आली होती. कनिका जवळपास 160 लोकांच्या संपर्कात आली होती. ज्यानंतर सर्वांची तपासणी केली गेली, ज्यापैकी 63 लोकांचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला. 

कनिका कपूर 9 मार्चला रोजी लंडनहून लखनऊला आली होती. आजपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एअरपोर्टवरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने ती वॉशरूममध्ये लपून तेथून पळून आली. कनिकाने रविवारी लखऊनच्या गॅलेंट अपार्टमेंटमध्ये एक पार्टी केली होती. त्यात लखनऊमधील मोठे अधिकारी आणि नेते शामिल होते. 

कनिका नुकतीच लंडनहून परतली असून ती तिच्या कुटुंबियांसोबत लखनऊ येथे राहात होती. तिने भारतात परतल्यानंतर चार पार्टींना हजेरी लावली असल्याचे तिच्या वडिलांनीच सांगितले आहे. या पार्टींमध्ये ती अनेक लोकांना भेटली होती. हॉटेल ताजमध्ये झालेल्या पार्टीत अनेक मंत्री, आयएस ऑफिसर, सेलिब्रेटी, नेतेमंडळी उपस्थित होते. तिने या पार्टींमध्ये अनेक लोकांसोबत हस्तांदोलन केले असून त्यांच्यासोबत फोटो देखील काढले आहेत. या पार्टीला लोकांसोबतच तिथे काम करणारी मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्व खासदार अकबर अहमद डम्पी यांच्या पार्टीत देखील कनिका गेली होती. या पार्टीत भाजपमधील अनेक नेते उपस्थित होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

BABIES DAY OUT @topshop @gianvitorossi @eliesaabworld @shaylinayak

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

या पार्टीत 400 हून अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती. तसेच एका व्यवासायिकाच्या पार्टीत देखील कनिका उपस्थित राहिली होती.  त्यामुळे तीन पार्ट्यांमध्ये एकूण 700 जणांच्या संपर्कात कनिका कपूर आल्याचे सांगितले जात आहे. 

कनिकावर लावण्यात आले  हे आरोप 

लंडनहून परत आल्यानंतर कनिकावर विमानतळावर स्क्रीनिंग न केल्याचा आरोप झाला आणि हे टाळण्यासाठी वॉशरूममध्ये लपून बसली. स्वत: सिंगरने मात्र हे आरोप फेटाळले आणि सांगितले की आंतरराष्ट्रीय विमानाने आलेल्या व्यक्तीला स्क्रीनिंगपासून वाचणे कसे शक्य आहे? मला मुंबई विमानतळावर दाखवले गेले आणि मी एक दिवस मुंबईत थांबली, पण सर्व काही लॉकडाऊन होते, म्हणून माझ्या आई-वडिलांनी मला घरी येण्याचा सल्ला दिला, त्यानंतर मी 11 मार्चला लखनऊला गेली. 

कनिका विरोधात एफआयआर दाखल

यूपी पोलिसांनी कनिकाविरोधात एफआयआर दाखल केला होता. या प्राणघातक रोगाचा प्रसार करण्याच्या आरोपाखाली सिंगरविरोधात आयपीसीच्या कलम 269 आणि 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...