Singer KK Dies: प्रसिद्ध गायक केके काळाच्या पडद्याआड, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आला Heart attack

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jun 01, 2022 | 08:12 IST

प्रसिद्ध गायक केके (Singer KK) यांचं निधन झाले आहे. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. केके हे बॉलिवूडमधलं एक प्रसिद्ध नाव होतं. केकेचं पूर्ण नाव कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) होतं.

Famous singer KK Passed Away Due to heart attack
प्रसिद्ध गायक केके काळाच्या पडद्याआड  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील 'तडप तडप के इस दिल से' हे त्यांचं गाणं सर्वाधिक लोकप्रिय झालं होतं.
  • केकेने बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत.
  • तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगाली या भाषांमध्ये केकेने गाणे गायली आहेत.

Singer KK Dies: प्रसिद्ध गायक केके (Singer KK) यांचं निधन झाले आहे. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. केके हे बॉलिवूडमधलं एक प्रसिद्ध नाव होतं. केकेचं पूर्ण नाव कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) होतं. परंतु केके याच नावाने तो प्रसिद्ध झाला. दरम्यान, केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत आपला शोक व्यक्त केला आहे. 

कार्यक्रमादरम्यान मंचावरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तो तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध होता. 53 वर्षीय केकेने बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत. बॉलीवूड व्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये त्याने गाणी रेकॉर्ड केली आहेत. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून केकेने पार्श्वगायनात आपले करियर सुरू केले होते. 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील 'तडप तडप के इस दिल से' हे त्यांचं गाणं सर्वाधिक लोकप्रिय झालं होतं. केके यांचा कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. केके यांनी स्वत: या कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली होती. परंतु या कार्यक्रमातच त्याला हृदयविकारा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात येण्यात आलं परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.  

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केकेच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी ट्वीट करून म्हटले की “केके नावाचे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे. त्याच्या गाण्यांमध्ये भावनांचे विस्तृत चित्रण होते. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रति संवेदना. ओम शांती”

सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्तासह अनेक सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. केके सर या जगात आता नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही, असे म्हणत अरमानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायकांपैकी केके एक आहेत. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

केके बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. केके यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत.  'खुदा जाने' सारखे रोमँटिक गाणे, 'इट्स द टाइम टू डिस्को' आणि 'कोई कहे कहता रहे' सारखे डान्स नंबर्स तसेच 'तडप तडप के इस दिल से' सारखे सॅड सॉन्गस आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी