KK Last Song: गायक केकेचे शेवटचे गाणे 'धूप पानी बहने दे' उद्या रिलीज होणार, गुलजार यांनी लिहिली आहेत गाणी

बी टाऊन
Updated Jun 05, 2022 | 17:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

KK Last Song: गायक केकेचे शेवटचे गाणे धूप पानी बहन दे उद्या रिलीज होणार आहे. हे गाणं गुलजार यांनी लिहिले आहे. तर शांतनू मोईत्रा यांनी संगीत दिले आहे.

Singer KK's last song 'Dhoop Pani Bahne De' will released tomorrow
गायक केकेचे शेवटचे गाणे सोमवारी होणार रिलीज   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गायक केके यांचे शेवटचे गाणे सोमवारी रिलीज होणार
  • 'शेरदिल द पिलीभात सागा' या सिनेमासाठी गायले गाणे
  • गुलजार यांच्या शब्दांना शांतनू मोईत्रा यांचे संगीत

Dhoop Paani Bahne De Song Out: गायक केकेने या जगाचा निरोप घेतला. पण तरीही तो त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहे. केके यांच्या निधनाची बातमी त्यांचे चाहते अजूनही पचवू शकलेले नाहीत. त्यांची गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केकेने एप्रिलमध्ये रेकॉर्ड केलेल्या शेवटच्या गाण्याची प्रत्येकजण वाट पाहत आहे. 
गाणे रेकॉर्डच्या वेळी केकेने स्वतः पोस्ट शेअर करून याची माहिती दिली होती. आता KK च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचे शेवटचे गाणे उद्या रिलीज होणार आहे.


केकेने 'शेरदिल द पिलीभात सागा' चित्रपटासाठी शेवटचे गाणे गायले. हे गाणं गुलजार यांनी लिहिले असून शांतनू मोईत्रा यांनी संगीत दिले आहे. धूप पानी बहने दो असे या गाण्याचे नाव आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

अधिक वाचा : पर्यावरण मंत्री म्हणाले हे झालं तर ती कोरोनाची चौथी असेल, पण


गाण्याचं पोस्टर केले रिलीज

गाण्याचे पोस्टर शेअर करताना तरण आदर्शने लिहिले – शेरदिल, केकेचे गाणे उद्या रिलीज होत आहे. या गाण्याचे नाव आहे धूप पानी बहने दो. गुलजार यांनी हे गाणे लिहिले आहे. 
पोस्टरवर लिहिले आहे- KK तू नेहमी आमच्या मनात राहशील. धूप पानी बहने दो हे गाणे उद्या रिलीज होणार आहे. केकेने हे गाणे गायले आहे. गुलजार साहेब यांनी गाणे लिहिलेले आणि शांतनू मोईत्रा यांनी संगीत दिले आहे.

शेरदिल द पिलीभीत सागा बद्दल बोलायचे तर या चित्रपटात पंकज त्रिपाठी, नीरज काबी आणि सयानी गुप्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शन आणि लेखन सृजित मुखर्जी यांनी केले आहे.हा चित्रपट २४ जून रोजी रिलीज होणार आहे

31 मे रोजी केकेने कोलकाता येथे शेवटचा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमादरम्यानच त्यांची प्रकृती खालावली होती.या घटनेनंतरच त्यांचा मृत्यू झाला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी