Singer KK Death: गायक केकेचा जीव वाचू शकला असता, पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

बी टाऊन
Updated Jun 02, 2022 | 17:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Singer KK Death: बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांचे पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरने मोठा खुलासा केला आहे. केकेच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याला वेळीच सीपीआर दिला असता तर त्याचा जीव वाचू शकला असता.

Singer KK's life could have been saved, postmortem doctor made a big revelation
तर केकेचा जीव वाचू शकला असता.   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
  • वेळेवर सीपीआर मिळाला असता तर गायक केके यांचा जीव वाचला असता
  • केके यांच्या हार्ट आर्टरिजमध्ये होते ब्लॉकेजेस

Singer KK Death: बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ (केके) यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी गुरुवारी सांगितले की त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अनेक ब्लॉकेजेस आहेत. त्यांना योग्य वेळी सीपीआर दिला असता तर त्याचा जीव वाचू शकला असता.

'केकेचा जीव वाचू शकला असता'

कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) मध्ये, बेशुद्ध व्यक्तीच्या छातीवर दाब दिला जातो आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातो, ज्यामुळे फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळतो.यामुळे हृदयविकाराचा झटका आणि श्वास घेण्यास असमर्थता आल्यास एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. केके यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
निधन व्हायच्या काही तास आधी कोलकाता येथील ‘नझरूल मंच’ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी परफॉर्म केले.

हार्ट आर्टरिजमध्ये होते ब्लोकेजेस

"KK च्या डाव्या मुख्य कोरोनरी धमनीमध्ये मोठा ब्लॉक होता  आणि इतर अनेक धमन्या आणि उप-धमन्यांमध्ये लहान ब्लॉकेज होते," डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. प्रेक्षकांसमोर परफॉर्मन्स दरम्यान, जास्त उत्तेजनामुळे, रक्तवाहून नेणाऱ्या यंत्रणेचे काम थांबले, ज्यामुळे त्याच्या हृदयाचे ठोके बंद झाले आणि त्याचा मृत्यू झाला.

अधिक वाचा : सौरव गांगुलीची आणखी एक पोस्ट चर्चेत, म्हणाले...

आधीच हृदयाशी संबंधित आजाराच्या समस्या होत्या

गायकाला बेशुद्ध पडताच सीपीआर दिला असता तर त्याचा जीव वाचू शकला असता,असे डॉक्टरांनी सांगितले. ते म्हणाले की गायकाला बऱ्याच काळापासून हृदयाशी संबंधित समस्या होत्या, त्यावर कोणतेही उपचार गायकाने घेतलेले नव्हते. 


स्टेजवर रक्ताभिसरण थांबले


डॉक्टर म्हणाले, “स्टेजवरील परफॉर्मन्सदरम्यान, केके स्टेजवर फिरत होता आणि काही वेळा गर्दीसोबत नाचत होता, ज्यामुळे जास्त उत्साह निर्माण झाला आणि रक्त रक्तवाहून नेणाऱ्या यंत्रणेचे काम थांबले त्यामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके बंद झाले. यामुळे केके बेशुद्ध झाले आणि त्यांच्या हृदयाचे ठोके बंद झाले. त्याला तातडीने सीपीआर दिला असता तर त्याचा जीव वाचू शकला असता.

अधिक वाचा :  पती - सासरच्यांना खुश ठेवणे या राशीच्या मुलींसाठी नाही सोपे


केकेजवळ अँटासिड औषधे सापडली


त्याने पुढे सांगितले की केके 'अँटासिड' घेत होते, 'कदाचित त्याला वेदना होत असावी आणि त्याला ते समजले नसेल. अँटासिड्स हे असे औषध आहे जे अपचन आणि छातीत जळजळ दूर करण्यासाठी घेतले जाते. कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केकेच्या पत्नीने गायक 'अँटासिड' घेत असल्याची पुष्टी केली आहे. 
अधिकाऱ्याने सांगितले, "केकेने फोनवरील संभाषणात पत्नीला सांगितले होते की, त्याचा हात आणि खांद्या दुखत आहे. "केकेच्या हॉटेलच्या रूममधून पोलिसांना अनेक 'अँटासिड' गोळ्याही सापडल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी