Malaika Arora Health Update: अभिनेत्री मलायका (Malaika Arora) अरोराचा शनिवारी संध्याकाळीअपघात झाला. (Road accident of Malaika Arora) त्यानंतर मलायकाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता तिची बहीण अमृता अरोराने (अमृता अरोरा हिने मलायका अरोरावर हेल्थ अपडेट दिली आहे) तिच्या बहिणीच्या तब्येतीचे अपडेट दिले आहे. अमृताने सांगितले की, तिचे सीटी स्कॅन करण्यात आले आहे, ज्यामध्ये सर्व काही ठीक आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, त्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्रीचा प्रियकर अर्जुन कपूर आणि बहीण अमृता अरोरा मलाइकाला घरी घेऊन गेले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका पुण्यातील एका कार्यक्रमातून मुंबईला परतत असताना महाराष्ट्रातील खोपोली येथे एक्सप्रेसवेवर तिच्या कारला अपघात झाला. या अपघातात तीन कारची धडक झाल्याचे वृत्त आहे. मात्र, मलायका किरकोळ जखमी झाल्याने तिला तातडीने जवळच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार म्हणाले, “मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 38 किमी अंतरावर हा अपघात झाला, जो अपघात प्रवण क्षेत्र आहे. तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने तीनही वाहनांचे नुकसान झाले."
खोपोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी सांगितले की, आम्हाला तिन्ही गाड्यांचे नोंदणी क्रमांक मिळाले असून, आता नेमके काय झाले हे जाणून घेण्यासाठी आम्ही मालकांशी संपर्क साधू. आता, आम्ही घटनेची पुष्टी केली आहे आणि अपघात कसा झाला आणि कोणाची चूक होती याचा तपास केल्यानंतर एफआयआर नोंदविला जाईल.