Bollywood News : सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे दररोज काहीतरी व्हायरल होत असते. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो (Bollywood Celebrity Childhood photo ) सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. फोटो समोर येताच लोक त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत इंटरनेटवर तुम्ही अनेक फिल्म स्टार्सचे बालपणीचे फोटो पाहिले असतील. आम्ही तुमच्यासाठी आणखी एका सेलिब्रिटीचा लहानपणीचा फोटो घेऊन आलो आहोत, व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्ही एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाला ( Rekha ) पाहू शकता. पण तिच्या मांडीवर बसलेल्या चिमुरडीला तुम्ही ओळखले का? ( Sitting in Rekha lap Ananya Pandey childhood photo is viral )
ही मुलगी आज बॉलीवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहे. लवकरच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत ती चित्रपटात दिसणार आहे. ओळखलं? रेखाच्या मांडीत बसलेली ही चिमुरडी दुसरी तिसरी कोणी नसून ही आहे अनन्या पांडे (Ananya Panday). अनन्या पांडेचा हा फोटो आहे जेव्हा ती काही महिन्यांची होती. रेखा या फोटोत नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे, तर लहान अनन्या फोटोमध्ये गोंडस दिसत आहे.
अधिक वाचा : काकू-बोक्याची Romantic Reel, Video बघून चाहते प्रेमात
अनन्या पांडेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची दीपिका पदुकोणच्या 'गेहराइयां' ( Gehraiyaan) चित्रपटात दिसली होती. लवकरच ती विजय देवरकोंडासोबत (Vijay Devarkonda ) 'लायगर'मध्ये ( Liger movie ) दिसणार आहे. अनन्या पांडे 'लायगर' चित्रपटातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच साऊथमध्ये अनन्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
अधिक वाचा : या कारणांमुळे बायको नवऱ्यांबरोबर करते कट-कट
अनन्या पांडे (Ananya Panday) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda ) लायगर सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्या आणि विजय देवरकोंडाने करण जोहरच्या कॉफी विथ करण या प्रसिद्ध चॅट शोमध्येही हजेरी लावली होती. त्यांचा एपिसोड सोशल मीडियावर खूपच गाजला होता. त्यावर अनेक मीम्ससुद्धा आली होती.