Celeb Photo Challenge: गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसणारी 'ही' चिमुरडी आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, सलमान खानसोबत आहे ग्रेट कनेक्शन

बी टाऊन
Updated Oct 30, 2022 | 18:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Celeb Photo Challenge: फोटोत दिसत असलेली गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील 'ही' मुलगी आहे बॉलिवूडची सध्याची टॉपची अभिनेत्री(Celeb Photo Challenge). फोटोतील या दोघीजणी बालपणीच्या मैत्रिणी आहेत. गुलाबी ड्रेसमधील ही मुलगी आता खूपच सुंदर दिसते. ही मुलगी एकापाठोपाठ एक हीट सिनेमा देत आहे. तसेच अशोक कुमार, किशोर कुमार, सायरा बानू आणि दिलीप कुमार हे तिचे नातेवाईक आहेत.

small girl in a pink dress is top bollywood actress
गुलाबी ड्रेसमधील 'ही' मुलगी ओळखा पाहू?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुलाबी ड्रेसमधील 'ही' मुलगी ओळखा पाहू?
  • 'ही' चिमुरडी आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री
  • कियारा अडवाणी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते

Celeb Photo Challenge: फोटोत दिसत असलेली गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील 'ही' मुलगी आहे बॉलिवूडची सध्याची टॉपची अभिनेत्री (Celeb Photo Challenge). फोटोतील या दोघीजणी बालपणीच्या मैत्रिणी आहेत. गुलाबी ड्रेसमधील ही मुलगी आता खूपच सुंदर दिसते. ही मुलगी एकापाठोपाठ एक हीट सिनेमा देत आहे. तसेच अशोक कुमार, किशोर कुमार, सायरा बानू आणि दिलीप कुमार हे तिचे नातेवाईक आहेत. (small girl in a pink dress is top bollywood actress)

कदाचित तुम्ही या चिमुरडीला ओळखलं असेल, ही दुसरी तिसरी कोणी नसून ही आहे अभिनेत्री कियारा अडवाणी. तिच्या बालपणीचा हा फोटो आहे. या फोटोत तिच्यासोबत ईशा अंबानी दिसत आहे. या दोघींनी एकत्र शिक्षण घेतलं होतं तसंच दोघी बालपणीच्या मैत्रिणी आहेत. 

अधिक वाचा : बिग बॉस मराठीमध्ये होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री

Happy Birthday Kiara Advani: THESE childhood pictures of the 'Kabir Singh' actress will melt your heart | The Times of India

कियारा अडवाणी शाहीन बानोची भाची आहे. शाहीन बानो सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जातं. तसंच अशोक कुमार यांची मुलगी भारती ही कियारा 
अडवाणीची आजी होती. कियाराचा भूल भुलैया 2 या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकच धमाल केली होती. या सिनेमात कियारासोबत कार्तिक आर्यन आणि तब्बू देखील होते. 
हा सिनेमा सुपरहिट झालाय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

अधिक वाचा : 'ही' आहे अनन्या पांडेची नेटवर्थ

2014 मध्ये फुगली या सिनेमातून कियारा अडवाणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, कियाराला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत कियाराने या सिनेमात काम केले होते. 'भूल भुलैया 2' या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत झळकली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. तसेच जुग जुग जियो या सिनेमात कियाराने वरुण धवनसोबत काम केले. तर शेरशाह सिनेमातील कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले. या सिनेमातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. 

कियारा आणि सिद्धार्थच्या अफेअरची चर्चा सध्या बी-टाउनमध्ये मोठ्या प्रमाणात रंगत आहे. एवढंच नाही तर याचवर्षी डिसेंबर महिन्यात कियारा आणि सिद्धार्थ लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चाही सध्या रंगतेय. मुंबईतचं त्यांचा लग्नसोहळा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी