मराठी अभिनेत्रीने केली आत्महत्या, पतीच्या अनैंतिक संबंधावरून दोघांमध्ये होते वाद 

बी टाऊन
Updated Aug 13, 2019 | 16:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

कळव्यातील गौरी सुमन सोसायटीत राहणाऱ्या मराठी अभिनेत्री प्रज्ञा म्हात्रे-पारकर हिने आपल्या १७ वर्षीय मुलीची हत्या करून आत्महत्या करण्याच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

marathi actress
मराठी अभिनेत्रीने केली आत्महत्या  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • प्रज्ञा पारकरच्या पतीचं अफेअर असल्याचीही चर्चा
  • प्रज्ञा पारकर यांना ९ ऑगस्ट रोजी केली होती आत्महत्या
  • प्रज्ञा पारकर यांनी मुलीची हत्या करून केली होती आत्महत्या

कळवा :  कळव्यातील गौरी सुमन सोसायटीत राहणाऱ्या मराठी अभिनेत्री प्रज्ञा म्हात्रे-पारकर हिने आपल्या १७ वर्षीय मुलीची हत्या करून आत्महत्या करण्याच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. पोलिसांनी या अभिनेत्रीच्या पतीला या प्रकरणी अटक केली आहे.  प्रज्ञा यांनी सुरूवातील मुलगी श्रृतीहीचा गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः पंख्याला लटून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांना पती प्रशांत पारकर याच्यावर संशय होता. त्यांनी प्रशांतला ताब्यात घेतले आणि पोलिसी दट्ट्या दाखवला. त्यानंतर त्याने कबुल केले की आपले अनैतिक संबंध होते. त्यामुळे घरात वाद होत होते. 

आत्महत्येपूर्वी प्रज्ञा यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात आपल्या या आत्महत्येप्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहून ठेवले होते.  पण या प्रकरणी पोलिसांना पती प्रशांत पारकरवर संशय आला त्यांना पतीला ताब्यात घेतले आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर त्यांना कबुली दिली की आपल्या अनैतिक संबंधामुळे कुटुंबात सतत वाद होत होते. 

ज्या दिवशी प्रज्ञा यांना आत्महत्या केली त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला होता. प्रशांत जीम जाण्याचा बहाण्याने घरातून बाहेर पडला. पण सततच्या वादाला कंटाळून प्रज्ञा यांना प्रथम मुलगी श्रृतीचा गळा दाबून खून केला आणि नंतर पंख्याला लटकून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस या प्रकरणी प्रशांत पारकर यांच्या सखोल चौकशी करत असून प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी एका महिलाचा प्रशांतच्या मोबाईलवर मेसेज दिसला त्यानंतर वादाला सुरूवात झाल्याचे चौकशीतून समोर आले आहे. 

कळव्यातील गौरी सुमन सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रज्ञाने ९ ऑगस्ट बुधवारी सकाळी तिचा पती प्रशांत जिमला गेला असताना हा सगळा प्रकार केला. प्रशांत जिममधून परत आल्यावर खूप वेळ दार वाजवून देखील कोणी तो उघडला नसल्याने त्याने तो फोडला. दार उघडताच समोरचा प्रकार बघताच प्रशांतच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रज्ञा हिने हॉलमधील पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. तर त्यांची १७ वर्षांची मुलगी श्रुती बेडरुमध्ये मृत अवस्थेत पडली होती. त्याचसोबत घरात एक सुसाईड नोटसुद्धा सापडली. या सुसाईड नोटमध्ये या सगळ्या प्रकाराची जबाबदारी प्रज्ञा हिने स्वीकारल्याचं समजतंय.

सुरूवातीला हा प्रकार आर्थिक चणचणीतून घडला असावा असे वाटले होते. पण पतीचे अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याचे आता तपासातून पुढे येत आहे. या प्रकरणी पोलिस अंतीम तपास केल्यावरच आत्महत्येचे नेमके कारण समजणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मराठी अभिनेत्रीने केली आत्महत्या, पतीच्या अनैंतिक संबंधावरून दोघांमध्ये होते वाद  Description: कळव्यातील गौरी सुमन सोसायटीत राहणाऱ्या मराठी अभिनेत्री प्रज्ञा म्हात्रे-पारकर हिने आपल्या १७ वर्षीय मुलीची हत्या करून आत्महत्या करण्याच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली