सोनाली बेंद्रेचा बोल्ड लुक तुम्ही पाहिलाय का?

बी टाऊन
Updated Aug 12, 2020 | 17:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

sonali bendre bold look: अभिनेत्री सोनाली बेंद्रे किंत्येक दिवसांनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या बोल्ड फोटोजमुळे ती चर्चेत आली आहे. 

sonali bendre
सोनाली बेंद्रेचा बोल्ड लुक तुम्ही पाहिलाय का?  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सोनालीवर हा लूक जबरदस्त दिसत होता
  • अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केल होते
  • सोनाली बेंद्रेने आपल्या फोटोंमध्ये लेदर पँट घातली आहे

मुंबई: सोनाली बेंद्रे(sonali bendre) ४५ वर्षांची झाली आहे. मात्र तिच्या सुंदरतेत कोणतीच कमतरता नाही. कॅन्सरला मात दिल्यानंतर ही अभिनेत्री आपले जीवन अधिक खुलेपणानने जगत आहे. लोक काय विचार करतील अथवा काय म्हणतील? याचा विचार आता सोनाली करत नाही आहे. याचेच उदाहरण म्हणजे तिने नुकतेच केलेले बोल्ड फोटोशूट(bold photoshoot). 

अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केल होते ज्यात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. तिच्या चाहत्यांनाही तिचा हा अंदाज दीर्घकाळानंतर पाहायला मिळाला. सोनालीने शेअर केलेले फोटो तिचे इतके वय असतानाही बोल्डनेस कमी झाला नसल्याचे दाखवतात. त्यामुळे सगळेच तिचे कौतुक करत आहेत. 

असा होता सोनालीचा लूक

सोनाली बेंद्रेने आपल्या फोटोंमध्ये लेदर पँट घातली आहे. ही स्किन फिट पँट तिच्या फिट फिगरला अधिक आकर्षित करत आहे. यासोबत अभिनेत्रीने क्रीम कलरचे स्वेटर घातले होते. हा स्वेटर डीप नेकलाईन होता. याला सोनालीने एका खांद्यावर स्लांटिंग लूक दिला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Stepped into my son's shoes... literally! @rockbehl, I am gonna keep these

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

यासोबतच या सुंदर अभिनेत्रीने काळ्या रंगाची लेस ब्रालेट घातली होती. यात स्पॅगेटी स्लीव्हस होते. तिच्या फुटवेअरबाबत बोलायचे झाल्यास तिने आपल्या या लुकला मॅचिंग म्हणून स्वेटरला मॅचिंग ठरणारे क्रीम कलरचे स्पोर्ट्स शूज घातले होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Stepped into my son's shoes... literally! @rockbehl, I am gonna keep these

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

सोनालीवर हा लूक जबरदस्त दिसत होता. तिच्या अदांमुळे तर हे फोटो अधिकच मोहक दिसत आहेत. हे फोटो खुद्द सोनालीलाही खूप पसंत आले. तिने कॅप्शनमध्ये तसे लिहिलेही आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Stepped into my son's shoes... literally! @rockbehl, I am gonna keep these

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

जुलै २०१८मध्ये सोनालीला कॅन्सर झाल्याचे तिने ट्विटवरून साऱ्यांना सांगितले. त्यानंतर न्यूयॉर्क सिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर कॅन्सरवर उपचार सुरू होते. 

सोनालीने १९९४मध्ये रिलीज झालेला सिनेमा आग मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर सोनालीने सरफरोश, हम साथ साथ है या सिनेमांमधून अभिनय केला. तिने शाहरूख खानच्या कल हो ना हो यासिनेमातही काम केले. सोनाली अनेकदा इंडियाज गॉट टॅलेंट, इंडियन आयडॉल ४ सारख्या टीव्ही शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी