Sonali Phogat : एकटीच सांभाळ करत होती मुलीचा, 6 वर्षांपूर्वी फार्महाऊसवर सापडला होता पतीचा मृतदेह

बी टाऊन
Updated Aug 23, 2022 | 15:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sonali Phogat Full Family Details: सोनाली फोगाटचे (Sonali Phogat)वडील व्यवसायाने शेतकरी आहेत, तिला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. सोनालीने तिच्या करिअरची सुरुवात 2006 मध्ये हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंगपासून केली होती.

Sonali Phogat husband died 6 years ago and Single parent daughter with other famlily members details
पतीच्या मृत्यूनंतर सोनाली फोगाट एकटीच सांभाळ करत होती मुलीचा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोनाली फोगाट बिग बॉस 14 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती.
  • बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी सोनालीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
  • 2006 मध्ये सोनालीने तिच्या करिअरची सुरुवात अँकरिंगपासून केली होती.

Sonali Phogat Family: बिग बॉसची स्पर्धक आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री या अभिनेत्रीचा गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सोनाली केवळ मनोरंजन क्षेत्राशीच नाही तर राजकारणाशीही जोडलेली होती. भाजप नेत्या सोनाली फोगाट यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत आदमपूर मतदारसंघातून कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, तिला सोशल मीडियावरील व्हिडिओंमधून प्रसिद्धी मिळाली. सोनाली फोगाटचा (Sonali Phogat) अनेकदा डान्स व्हिडिओंमध्ये बोलबाला होता आणि रातोरात प्रसिद्धी मिळवल्यानंतर अभिनेत्रीला बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून दिसण्याची संधी मिळाली. सोनाली फोगाट  बिग बॉस 14 (Big Boss 14 ) मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. (Sonali Phogat husband died 6 years ago and Single parent daughter with other famlily members details)

सिंगल मदर होती सोनाली फोगाट 

सोनाली फोगाटचा (Sonali Phogat) जन्म शेतकरी कुटुंबात झाला. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिचे लग्न झाले. सोनाली फोगाटचे (Sonali Phogat) लग्न तिच्या बहिणीचा मेहुणा संजयसोबत झाले होते. 2016 मध्ये हरियाणातील त्याच्या फार्महाऊसवर संजयचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सोनाली त्यावेळी मुंबईत होती. सोनालीचे पती राजकारणात होते.

अधिक वाचा : टिकटॉक स्टार असलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाटचे खास किस्से

पतीच्या निधनानंतर तिचा मानसिक छळ झाला, तरीही ती खंबीर राहिली, असे तिने सांगितले होते. सोनालीला यशोधरा फोगट नावाची मुलगी देखील आहे. यशोधरा मुंबईत शिकते आणि सोनालीने एकटीच तिला वाढवत होती. 


वादग्रस्त व्हिडिओमुळे मिळाली होती प्रसिद्धी

बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी सोनालीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती एका अधिकाऱ्याला चप्पलने मारताना दिसली. सोनाली एक प्रसिद्ध टिक टॉक स्टार आहे.  तिने अनेक पंजाबी आणि हरियाणवी म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे.

Sonali Phogat Wiki, Height, Age, Husband, Family, Biography & More - WikiBio

दूरदर्शनमध्ये अँकरिंगने केली होती करिअरला सुरुवात

सोनालीच्या पश्चात तिचे वडील व्यवसायाने शेतकरी आहेत. तिला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. सोनाली फोगाटने तिच्या करिअरची सुरुवात 2006 मध्ये हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंगपासून केली होती. गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. सोनाली तिच्या स्टाफसोबत तिथे गेली होती. 

अधिक वाचा : लेकरांना कडेवर घेऊन करते फूड डिलिव्हरी

राजकारणात सोनाली फोगाटची एन्ट्री कशी झाली?

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यामुळे सोनालीने राजकारणात प्रवेश केला. सोनाली फोगाटचं (Sonali Phogat) सुमित्रा महाजन यांच्या घरी येणं जाणं आधीपासूनच होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ओळख सुमित्रा महाजन यांनीच करून दिली होती. नितीन गडकरींच्या सांगण्यावरून सोनाली फोगाटने झारखंड आणि मध्य प्रदेशात भाजपसाठी काम करायला सुरुवात केली. अशाप्रकारे त्यांची राजकारणात एन्ट्री झाली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी