'Sonali Phogat च्या जेवणात होते विष', सोनालीच्या बहिणीचा धक्कादायक खुलासा

Sonali Phogat's Sister Shocking Revelation: भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगटच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. नुकताच सोनाली फोगटच्या बहिणीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

sonali phogats sister made a shocking disclosure said poison was mixed in my sisters food
'Sonali Phogat च्या जेवणात होते विष', सोनालीच्या बहिणीचा धक्कादायक खुलासा  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सोनाली फोगट भाजप नेत्या असण्यासोबतच अभिनेत्री होती.
  • सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
  • सोनाली फोगटच्या बहिणीने धक्कादायक खुलासा केला आहे.

Sonali Phogat's Sister Shocking Revelation: नवी दिल्ली: भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगटच्या (Sonali Phogat)  मृत्यूने (Sonali Phogat Death) सर्वांनाच धक्का बसला आहे. बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सोनाली फोगट हिचे आज सकाळी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (Sonali Phogat Death News) इतरांप्रमाणेच सोनाली फोगटच्या बहिणीलाही ही बातमी समजताच मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान सोनाली फोगटच्या बहिणीने (Sonali Phogat's Sister Allegations) तिच्या सोनालीच्या जेवणात विष मिसळल्याचा आरोप केला आहे. (sonali phogats sister made a shocking disclosure said poison was mixed in my sisters food)

एका स्थानिक वाहिनीशी बोलताना सोनाली फोगटच्या बहिणीने सांगितले की, माझी बहीण ठीक आहे आणि शूटसाठी बाहेर जात आहे. सोनाली फोगटने सर्वांना माहिती दिली होती की ती 27 ऑगस्टला परतणार आहे. पण काल ​​सकाळी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी सोनालीने तिच्या आईला जेवल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं होतं. रात्रीही सोनालीने आपल्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचे सांगितले होते. सोनालीला तिच्या जेवणात काहीतरी मिसळल्याचा संशय आला.

अधिक वाचा: Bollywood News : 'या'डान्सरविरोधात अटक वॉरंट जारी, चार वर्षे जुन्या प्रकरणात लखनऊ न्यायालयाने दिले अटकेचे आदेश

सोनालीच्या बहिणीला जेव्हा तिच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला. यावेळी सोनालीच्या बहिणीने सांगितले की, सोनाली म्हणाली होती की, 'माझ्याविरोधात काही तरी षडयंत्र रचले जात आहे...'. 

सोनाली काही लोकप्रिय पंजाबी आणि हरियाणवी म्युझिक व्हिडिओंमध्ये (Sonali Phogat Music Videos)दिसली होती. तिने टीव्ही शो 'अम्मा: एक मां जो लाखों के लिए बनी अम्मा'मध्ये नवाब शाहच्या पत्नीची भूमिका साकारली होती. 2020 मध्ये सोनालीने बिग बॉस 14 मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री देखील केली होती. सोनाली भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षाही होत्या.

अधिक वाचा: Sonali phogat : टिकटॉक स्टार असलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाटचे खास किस्से, कोण होत्या फोगाट

सोनाली फोगाटची राजकारणात कशी झाली होती एन्ट्री ?

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यामुळे सोनालीने राजकारणात प्रवेश केला. सोनाली फोगाटचं सुमित्रा महाजन यांच्या घरी येणं जाणं आधीपासूनच होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ओळख सुमित्रा महाजन यांनीच करून दिली होती. नितीन गडकरींच्या सांगण्यावरून सोनाली फोगाटने झारखंड आणि मध्य प्रदेशात भाजपसाठी काम करायला सुरुवात केली होती. अशाप्रकारे त्यांची राजकारणात एन्ट्री झाली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी