Sonam Kapoor: सोनम कपूर- आनंद आहुजाच्या दिल्लीतील घरात चोरी; तब्बल १.४१ कोटींचे दागिने आणि रोकड लंपास 

बी टाऊन
Updated Apr 09, 2022 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sonam Kapoor Delhi home robbed । अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण या जोडप्याच्या दिल्लीतील घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. घरातील १.४१ कोटी रूपयांची रोकड आणि दागिने लंपास केल्याचे उघड झाले आहे.

Sonam Kapoor and Anand Ahuja's house robbed in Delhi
सोनम कपूर- आनंद आहुजाच्या दिल्लीतील घरात चोरी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोनम कपूर- आनंद आहुजाच्या दिल्लीतील घरात चोरी.
  • तब्बल १.४१ कोटींचे दागिने आणि रोकड लंपास.
  • आनंद आहुजाच्या आज्जीने या प्रकरणाची प्रथम तुघल रोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Sonam Kapoor Delhi home robbed । नवी दिल्ली : अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण या जोडप्याच्या दिल्लीतील घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. घरातील १.४१ कोटी रूपयांची रोकड आणि दागिने लंपास केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हे जोडपे लवकरच आईबाबा होणार आहे. (Sonam Kapoor and Anand Ahuja's house robbed in Delhi). 

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, आनंद आहुजाच्या आज्जीने या प्रकरणाची प्रथम तुघल रोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. गंभीर प्रकरण लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपास हाती घेतला आणि शोध मोहिमेसाठी पथक तयार केले. माहितीनुसार, दिल्ली पोलिस २५ कर्मचाऱ्यांशी बोलत आहेत. याशिवाय नऊ केअर टेकर, ड्रायव्हर, माळी व इतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करत आहेत. दिल्ली पोलिसांशिवाय फॉरेन्सिक टीमही घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे. 

अधिक वाचा : शंभर रुपयांच्या इंधनावर महाराष्ट्रात सर्वाधिक ६५ रूपयांचा कर

घरात राहतात सासू-सासरे

सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा आणि सासू प्रिया आहुजा हे दिल्लीतील अमृता शेरगिल या निवासस्थानी राहतात. याशिवाय आनंद आहुजाची आज्जी सरला आहुजा देखील त्यांच्यासोबत राहते. सरल आहुजा यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी कपाटातील दागिने आणि रोख रक्कम तपासली असता चोरी झाल्याचे समजले. त्यांनी २३ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. त्यांनी म्हटले, दागिन्यांची शेवटची तपासणी दोन वर्षांपूर्वी झाली होती. तसेच हायप्रोफाईल प्रकरण असल्याने तपास गुप्त ठेवण्यात आला आहे. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही.

संशयितांवर पोलिसांची नजर 

माध्यमांच्या माहितीनुसार, पोलिस मागील एक वर्षातील सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डिंगची छाननी करत आहेत. ते संशयितांचा शोध घेत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे सोनम कपूरचा पती आनंद आहुजा त्याचे काका सुनिल यांच्या सोबत कॅलिफोर्नियामध्ये राहतो. 

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी दिल्लीत ३१७० स्क्वेअर यार्डमध्ये पसरलेला बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत तब्बल १७३ कोटी रुपये आहे. हा भूखंड ९००० चौरस फुटांमध्ये पसरल्याचे बोलले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी