Sonam Kapoor baby boy : सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Aahuja) यांनी त्यांच्या बाळाच्या आगमनाची घोषणा केल्याने सर्वांना आनंद झाला. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये (Social media post ), त्यांनी लिहिले की , "20.08.2022 रोजी, आम्ही आमच्या बाळाचे स्वागत केले. या प्रवासात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबाचे आभार. ही फक्त सुरुवात आहे, पण आम्हाला माहित आहे की आमचे आयुष्य कायमचे बदलले आहे. सोनम आणि आनंद." (Sonam Kapoor arriving Anil Kapoor house with husband Anand aahuja and Son)
आज सोनम आणि आनंद अनिल कपूरच्या घरी पोहोचताना दिसले. त्याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. व्हिडिओमध्ये, सोनम कपूर, आनंद आहुजा आणि बाळ दिसत आहेत. आनंद आहुजा खूपच आनंदी दिसत आहे कारण त्यांनी आपल्या बाळाला आपल्या मिठीत घेतले आहे.
अधिक वाचा : 10 सप्टेंबरपासून मिळणार हास्याचा डबल डोस
सोनम आणि आनंद आहुजा यांनी अजून आपल्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी सोनमची बहीण रिया कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या भाच्याचा फोटो शेअर केला. "फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये रेहा कपूरने लिहिले की, 'रेहा मावशीचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे . तू खूप गोंडस आहेस. हा क्षण स्वप्नासारखा आहे. आई सोनम कपूर, वडील आनंद आहुजा. नवीन आजोबा आणि आजी अनिल कपूर आणि सुनीता कपूर सगळ्यांकडून खूप खूप प्रेम."आनंदनेही आपल्या मुलाच्या पहिल्या झलकवर प्रतिक्रिया दिली होती. एकूणंच काय तर सध्या नाना अनिल कपूर आणि नानी सुनिता कपूरसह साऱ्यांचाच आनंद गगनात मावेनासा झालाय.
अधिक वाचा : विक्रम वेधच्या टीझर इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ
सोनमने केलेल्या प्रेग्नंसी फोटोशूटबद्दल तिला ट्रोल करण्यात आले होते. त्यावर काही दिवसांपूर्वीच सोनमने प्रतिक्रिया दिली. एका मुलाखतीत तिला विचारले असता त्यावर तिने तिचे मत मांडले. ती म्हणाली, “मला वाटते की कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. वयानुसार तुमच्यात ती प्रगल्भता येतेच. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. मी एका चांगल्या आणि सधन कुटुंबातून आले आहे. माझं आयुष्य खूप सुरक्षित आहे. माझ्याकडे अक्षरशः तक्रार करण्यासारखे काहीही नाही, त्यामुळे माझ्या मागे माझ्याबद्दल कोणी नकारात्मक बोलत असेल, वाईट बोलत असेल तर त्याने मला काहीही फरत पडत नाही." असे सोनम कपूरने आवर्जून सांगितले.