पावसाने हैराण सोनम कपूरने सोशल मीडियावर मागितली मदत, मुंबई पोलिसांनी असं दिलं उत्तर! 

बी टाऊन
Updated Jul 02, 2019 | 17:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sonam Kapoor: मुंबईत जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. यामुळे सामन्यांप्रमाणेच सेलिब्रिटींना देखील बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

sonam_kapoor_instagram
पावसाने त्रस्त सोनम कपूरने सोशल मीडियावर मागितली मदत  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे सामान्य नागरिकांसह आता सेलिब्रिटींना देखील त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईत फक्त रेल्वे सेवा किंवा रस्ते वाहतूकच विस्कळीत झालेली नाही तर विमानसेवाही कोलमडली आहे. कारण मुंबई विमानतळावर देखील पाणी साचलं आहे. त्यामुळे अनेक विमानाचं उड्डाणं ही उशिराने होत आहेत. यामुळेच बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिला देखील बराच त्रास झाला आहे. ज्यामुळे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांची मदत घेतली आहे. सोनम कपूरने ट्वीट करुन थेट मुंबई पोलिसांकडे विचारणा केली. 

'कुणी मला सांगू शकतं की, विमानतळ सुरु आहे की नाही?' असं ट्वीट करुन सोनमने बीएमसी, मुंबई पोलीस, आणि मुंबई विमानतळ यांना टॅग केलं. सोनमच्या या ट्वीटनंतर मुंबई पोलिसांनी तिची तात्काळ मदत केली. त्यांनी तिला विमानतळाबद्दल योग्य ती माहिती दिली. 

मुंबई पोलिसांनी सोनमला उत्तर देताना असं म्हटलं आहे की, 'विमानतळ व्यवस्थापकाकडून मिळालेल्या माहितीनुसार हवामानामुळे बरीच विमानं ही उशिराने उड्डाणं करीत आहेत. विमानतळावर जाण्याआधी आपल्या फ्लाइटचं स्टेट्स तपासून पाहा. तसंच अनेक ठिकाणी पाणी भरल्याने विमानतळापर्यंत पोहचण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.' मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या या सविस्तर उत्तरानंतर सोनमने त्यावर तात्काळ आपली प्रतिक्रिया देखील दिली. 'दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद मुंबई पोलीस', सोनमने असं ट्वीट करुन ते पुन्हा मुंबई पोलिसांना टॅग केलं. 

दुसरीकडे अभिनेत्री रकुल प्रीतने देखील सोनमच्या ट्वीटला उत्तर दिलं. 'काल रात्रीपासून कोणत्याही विमानाचं उड्डाण झालेलं नाही. मी एअरपोर्टवरच अडकली आहे.' मुंबईत गेल्या २४ तासापासून मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. सखल भागाप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील पाणी भरलं आहे. ज्याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. 

सोनम कपूर ही 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या सिनेमात शेवटची दिसली होती. त्यानंतर आता ती द झोया फॅक्टर या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी