सोनम कपूरच्या या ड्रेसची किंमत किंमत ऐकून व्हाल थक्क

बी टाऊन
Updated Jun 11, 2019 | 13:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sonam Kapoor’s Costly Birthday Dress: बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूरने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. यानंतर तिचा ग्लॅमरस लूक चर्चेत आलाय. फक्त हा लूकंच नाही तर त्याची किंमत सुद्धा लक्ष वेधून घेत आहे.

Sonam Kapoor costly birthday dress
सोनम कपूरच्या या ड्रेसची किंमत किंमत ऐकून व्हाल थक्क  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: सोनम कपूर हिला बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हंटलं जातं. तिची फॅशन टेस्ट हटके आहे त्याचसोबत कायम ती चर्चेत राहीली आहे. एवढच काय तर याच तिच्या हटके फॅशन सेन्सला घेऊन सोनमने तिची बहिण रेह्या सोबत रेसन नावाचा एक फॅशन ब्रॅण्ड मध्यंतरी लॉन्च केला जो सध्या उत्तम सुरु आहे. बॉलिवूडची ही ग्लॅमरस दिवा तिच्या प्रत्येक लूकमध्ये कायम वेगळं काहीतरी करताना दिसते. असाच वेगळेपणा तिच्या यंदाच्या बर्थडे लूकचं खास आकर्षण ठरला. सोनम कपूरने नुकताच तिचा 34वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा केला. ज्यासाठी अनेक बॉलिवूडकरांची हजेरी लागली सोबत मीडियासुद्धा होतीच. यावेळी खास चर्चा झाली ते सोनमच्या बर्थडे लूक आणि तिच्या ड्रेसची.

सोशल मीडियावर तर तिचा हा लूक फारच गाजला. पण या ग्लॅमरस लूकची किंमत तुम्ही ऐकली तर चक्क व्हाल. सोनमने यावेळी एक कॅझ्युअल नॉटेड पांढरं शर्ट आणि एक मेटॅलिक प्लिटीड स्कर्ट घातला होता. शर्ट कॅझ्ययुअल लूकचं असलं तरी त्याची डीप नेकलाईक फारच ग्लॅमरस दिसत होती. या शर्टला बटन्स नव्हती तर खाली एक गाठ बांधायला होती. या शर्टला अधिक पार्टी लूक देण्यासाठी त्याच्या सोबतीला असलेला स्कर्ट एकदम परफेक्ट होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#sonamkapoor today on occasion of her birthday #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

हे नॉटेड शर्ट प्रसिद्ध फ्रेन्च फॅशन डिझायनर सायमन जॅकीमूसच्या कलेक्शनमधलं होतं, तर सिल्वर मेटॅलिक प्लिटीड स्कर्ट हा लंडनमध्ये स्थित जगप्रसिद्ध डिझायनर एमिलिया विकस्टेड हिने डिझाइन केलेला होता. या दोन्हींची किंमत मिळून लाखांच्या घरात जाते. होय, बरोबर वाचलत तुम्ही. तब्बल एक लाख रुपयांचा होता हा सोनमचा ग्लॅमरस फॅशनेबल बर्थडे लूक. जिथे शर्टची किंमत 587 डॉलर्स म्हणजेज तब्बल 40 हजार 800 रुपये इतकी आहे तर स्कर्ट 711 पाऊंड्स म्हणजेज 62 हजार रुपयांचा आहे. म्हणजे दोघांची किंमत मिळून 1 लाख 2 हजार 800 रुपये इतकी होते.

या दोन्हींसोबत सोनमने त्या लूकला शोभेल अशी ज्वेलरी कॅरी केली होती. गळ्यात एक सिंपल लेयर चोकर आणि कानात डायमंड स्टड्स. तर हातात अंगठी अशी तिची ज्वेलरी होती. सोबतच रेड हॉट लिप्स्टिकने तिच्या या लूकला वेगळीच उभारणी मिळाली. शिवाय केसांची स्टाईल सुद्धा तिने अगदी साधी सरळ सोप्पी ठेवली होती. साईड पार्टीशनसोबत कर्ल केलेली एक बट. या लूकला तिने पूर्ण केलं ते आरश्यांची डिझाइन असलेल्या फ्लॅट बॅलरिना बूटांनी. हा तिचा लूक येत्या काही दिवसांत फॅशन स्टेमेन्ट म्हणून अनेक तरुणी फॉलो करताना नाही दिसल्या तरंच नवल. तिच्या या बर्थडे बॅशला तिच्या अनेक जवळच्या मित्रपरिवाराने हजेरी लावली, त्यात तिची खास मैत्रीण मसाबा गुप्ता सुद्धा होती. कामाचं म्हणाल तर अनेक दिवस मोठ्या पडद्यावर न दिसलेली सोनम लवकरच जोया फॅक्टर सिनेमात झळकणार आहे. तिचा हा सिनेमा येत्या 20 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सोनम कपूरच्या या ड्रेसची किंमत किंमत ऐकून व्हाल थक्क Description: Sonam Kapoor’s Costly Birthday Dress: बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूरने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. यानंतर तिचा ग्लॅमरस लूक चर्चेत आलाय. फक्त हा लूकंच नाही तर त्याची किंमत सुद्धा लक्ष वेधून घेत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles