सोनम कपूर ते करीना कपूर खान: ५ अभिनेत्रींनी वयाहून लहान अभिनेत्यांशी केलाय रोमान्स

बी टाऊन
Updated Apr 19, 2019 | 09:10 IST | Times Now

वय हा केवळ एक आकडा असतो. कोणत्याच गोष्टीला वयाचे बंधन कधीच नसते हे बऱ्याच उदाहणावरून दाखवून दिले आहे. पडद्यावरील रोमान्सही त्यात मागे कसा राहील.

actress
अभिनेत्री आणि अभिनेते  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्याहून कमी वयाच्या अभिनेत्यांसोबत पडद्यावर रोमान्स केला. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसली होती. आतापर्यंत मोठ्या वयाचे हिरो आणि लहान वयाची हिरोईन हे समीकरण बॉलिवूडमध्ये चांगलेच गाजले. मात्र बॉलिवूडच्या काही हिरोईन्सनी या गोष्टीला छेद दिला. खरंतर ही कन्सेप्ट काही नवीन नाही. याआधी १९९३मध्ये आलेल्या माया मेमसाबमध्ये शाहरूख खाने दीपा साही यांच्यासोबत रोमान्स केला होता. 

जाणून घ्या गेल्या पाच वर्षात कोणत्या अभिनेत्रींनी केला आपल्याहून लहान वयाच्या अभिनेत्याशी रोमान्स

सोनम कपूर आणि राजकुमार राव(२०१९)

नुकत्याच आलेल्या एक लडकी को देखो तो ऐसा लगा या सिनेमातून ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली होती. ट्रेलरच्या सुरूवातीला सोनम राजकुमार रावशी रोमान्स करताना दिसते मात्र खरे चित्र वेगळेच असते. 

ऐश्वर्या राय बच्चन आणि राजकुमार राव(२०१८)

राजकुमार रावने केवळ सोनमच नव्हे तर आणखी एका मोठ्या अभिनेत्रीसोबत पडद्यावर रोमान्स साकारला आहे. फॅनी खान या सिनेमात राजकुमार राव आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी दिसली होती. या जोडीला प्रेक्षकांनीही पसंती दिली होती. 

ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर(२०१६)

ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर ही जोडी आपल्याला ऐ दिल है मुश्किलमध्ये पाहायला मिळाली होती. यात ती अतिशय सुंदर दिसत होती. ऐश्वर्याला सौंदर्याचे देणे लाभले आहे त्यामुळे तिची कोणासोबतही जोडी ही छानच दिसते.

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर(२०१६)

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी फितूर या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आली होती. हा सिनेमा काही सुपरहिट ठरू शकला नाही. 

करीना कपूर आणि अर्जुन कपूर(२०१६)

कि अँड का या सिनेमातून पहिल्यांदा करीना कपूर आणि अर्जुन कपूर ही जोडी मोठ्या पडद्यावर आली होती. या जोडीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तितकेसे यश मिळाले नाही. या सिनेमाने केवळ ५२.३१ कोटी रूपये कमावले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सोनम कपूर ते करीना कपूर खान: ५ अभिनेत्रींनी वयाहून लहान अभिनेत्यांशी केलाय रोमान्स Description: वय हा केवळ एक आकडा असतो. कोणत्याच गोष्टीला वयाचे बंधन कधीच नसते हे बऱ्याच उदाहणावरून दाखवून दिले आहे. पडद्यावरील रोमान्सही त्यात मागे कसा राहील.
Loading...
Loading...
Loading...