Sonam Kpoor : प्रेग्नंसी फोटोशूटमुळे सोनम कपूर (Sonam Kapoor) ट्रोल झाली होती. त्यावर नुकतीच तिने आपले मत व्यक्त केले आहे. अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) यांच्या घरी बाळाचा जन्म झाला आहे. इंस्टाग्रामवर त्यांनी ही बातमी शेअर केली. ( Sonam kapoor talked on being trolled for her maternity photoshoots)
सोनम कपूरने (Sonam Kapoor) व्होगला दिलेल्या मुलाखतीत तिच्या मॅटर्निटी शूटसाठी ट्रोल झाल्याबद्दल सांगितले. प्रेग्नंसी फोटोशूटसाठी ट्रोल झाल्याबद्दल विचारले असता सोनम म्हणाली, “मला वाटते की कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. वयानुसार तुमच्यात ती प्रगल्भता येतेच. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. मी एका चांगल्या आणि सधन कुटुंबातून आले आहे. माझं आयुष्य खूप सुरक्षित आहे. माझ्याकडे अक्षरशः तक्रार करण्यासारखे काहीही नाही, त्यामुळे माझ्या मागे माझ्याबद्दल कोणी नकारात्मक बोलत असेल, वाईट बोलत असेल तर त्याने मला काहीही फरत पडत नाही." असे सोनम कपूरने आवर्जून सांगितले. "मातृत्व हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आज मी माझे शरीर आणि माझे स्त्रीत्व साजरे करत आहोत. डोळ्याखालची काळी वर्तुळे, पीसीओएस, वजन वाढणे, स्ट्रेच मार्क्स यासारख्या गोष्टींवर मी नेहमीच सार्वजनिकरित्या चर्चा करते." त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नसल्याचंही सोनमने म्हटलं आहे.
अधिक वाचा : Liger review अनेकांना आवडला VDचा 'Liger' अभिनय
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी शनिवारी बाळाचे स्वागत केले. त्यांनी आपल्या बाळाच्या आगमनाची बातमी इंस्टाग्राम पोस्टद्वारे जाहीर केली.पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: "२०.०८.२०२२ रोजी, आम्ही आमच्या सुंदर बाळाचे मनापासून स्वागत केले.या प्रवासात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्सेस, मित्र आणि कुटुंबियांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे पण आम्हाला माहित आहे आमचे आयुष्य कायमचे बदलले आहे - सोनम आणि आनंद."
सोनम कपूरने तिच्या फोटोशूटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि ते खूपच सुंदर होते.
अधिक वाचा : 'हाऊस ऑफ ड्रॅगन'चे कोटीच्या घरात व्ह्यूज
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी काही वर्षे डेटिंग केल्यानंतर मे २०१८ मध्ये मुंबईत लग्न केले. त्यांचे लग्न आणि रिसेप्शन एकदम ग्रँजर होते. आनंद आहुजा एक बिझनेसमन आहेत.