what happened to sonu nigam : प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांना मुंबईत चेंबूर येथे एका कार्यक्रमाच्या ठिकाणी धक्काबुक्की झाली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील आणि पुतण्या यांना सोनूसह सेल्फी घ्यायचा होता, त्यावरुनच हा वाद झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चेंबूरमध्ये तीन दिवसांपासून मैफल सुरू आहे. या मैफलीत सोनू निगम आला होता. गायक सोनू निगम तिथून निघत असताना स्वप्नील फातर्पेकर याला सोनूसोबत सेल्फी घ्यायचा होता. यावेळी सोनूच्या सुरक्षारक्षकासोबत त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.
लाईव्ह कॉन्सर्टनंतर सोनू निगम स्टेजवरुन खाली येत असताना एका व्यक्तीने त्याला पकडले. आक्षेप घेतल्यानंतर त्याने सोनू निगम आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींना पायऱ्यांवरून ढकलले, त्या दोघांपैकी एक जण जखमी झाला. स्वप्नील फातर्पेकर असे आरोपीचे नाव असल्याची माहिती झोन 6 चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी दिली.
धक्काबुक्कीच्या घटनेनंतर लगेच गायक सोनू निगम तसेच आणखी काही जणांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. गायक सोनू निगम सुखरुप आहे. सोनूचे गुरु गुलाम मुस्तफा खान यांचे सुपुत्र रब्बानी खान, सोनूचा निकटवर्तीय आणि सुरक्षारक्षक यांना दुखापत झाली. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ मोबाईल
सोनूच्या सुरक्षारक्षकांशी बाचाबाची करणाऱ्या स्वप्नीलचे वडील आमदार प्रकाश फातर्पेकर फेस्टिव्हलचे एक आयोजक आहेत. फेस्टिव्हलची सांगता सोनूच्या परफॉर्मन्सने झाली. यानंतर सोनू आणि त्याच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. पोलीस कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांचे फूटेज तपासत आहेत.
दररोज आरामात 10 हजार पावले चालण्याच्या ट्रिक्स
गायक सोनू निगम याने दिलेल्या माहितीआधारे आयपीसी 323 (दुखापत करणे), 341 (चुकीचा हेतू), 337 (दुसऱ्याची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे अथवा दुसऱ्याला दुखापत करणे) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.