ऑक्सिजनचा पुरवठा रोखणाऱ्या चीनला भिडला 'सुपर हिरो'; नंतर लगेच आलं चिनी राजदूताचं ट्विट

बी टाऊन
भरत जाधव
Updated May 02, 2021 | 17:34 IST

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन (Oxygen)ची कमतरता जाणवत आहे, भारताच्या स्थितीविषयी अनेक देशांनी चिंता व्यक्त करत भारताला मदत देणं सुरू केलं आहे.

sonu sood alleges china
ऑक्सिजनचा पुरवठा रोखणाऱ्या चीनला भिडला 'सुपर हिरो'  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • सोनू सूदचं चिनी राजदुताला ट्विट
  • चीनने ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स अडवले
  • कोरोना काळात अभिनेता सोनू सूदची लोकांना मदत

नवी दिल्ली:  देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन (Oxygen)ची कमतरता जाणवत आहे, भारताच्या स्थितीविषयी अनेक देशांनी चिंता व्यक्त करत भारताला मदत देणं सुरू केलं आहे. याच दरम्यान चीनने ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स (Oxygen concentrators) अडवले आहेत, यावर भारताचा सुपर हिरो अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) ने ट्विट करत चीनला प्रश्न केला. 

हे ट्विट भारतातील चिनी राजदुता(Chinese Ambassador)ला टॅग करत सोनू सूद म्हणाला की, ऑक्सिजन केंद्रावर चीन अडथळे निर्माण करीत आहे. आमची खेप मोकळी करावी, आम्हाला मदत करा, जेणेकरुन लोकांचे जीव वाचू शकतील. अशा आशयाचं ट्विट सोनूने केलं होते.  सोनू सूदच्या ट्विटवर उत्तर देण्यास विलंब न करता चिनी  राजदूताने लिहिले आहे की, 'कोरोनाविरूद्धच्या लढाईत चीन पूर्णपणे सहकार्य करेल. चिनी राजदूताने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं  की 'माझ्या माहितीनुसार सर्व मालवाहू मार्ग सामान्य आहेत'. या प्रतिक्रियेला सोनू सूद यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत अभिनेता सोनू सूद परत एकदा गरजूंची मदत करण्यासाठी मैदानात उतरला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोनूने घरी परतणाऱ्या मजुरांना मदत केली होती. आता सोनू मेडिकल साहित्यांची जुळवाजुळव करत आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी