अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

अभिनेता सोनू सूद याला कोरोना झाला. त्याने स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली.

sonu sood covid19 positive
अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह
  • सोनू सूद झाला होम क्वारंटाइन
  • वैद्यकीय उपचार घेत आहे सोनू सूद

मुंबईः अभिनेता सोनू सूद याला कोरोना झाला. त्याने स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली. अभिनय आणि समाजकार्य या दोन्हीसाठी सोनू सूद प्रचंड लोकप्रिय आहे. sonu sood covid19 positive

सोनू सूद याने कोरोना संकटाच्या काळात अनेक गरीबांच्या जेवणाची व्यवस्था केली. तसेच अनेक परप्रांतीय नागरिकांना मुंबईतून सुरक्षितरित्या घरी जाण्यासाठी व्यवस्था करुन दिली. या व्यवस्थेचा खर्च सोनू सूदने उचलला. स्वतःजवळचे पैसे तसेच इतरांनी समाजकार्याच्या हेतूने दिलेला निधी यांचा व्यवस्थित वापर करुन सोनू सूदने हे काम केले. गरीबांना इ-रिक्षाचे वितरण, गरीब मुलांसाठी विनामूल्य ऑनलाइन शिक्षण अशा समाजोपयोगी योजनाही अभिनेता सोनू सूद याने राबवल्या. आता तो आणि त्याचा मित्र जॉन्सन संयुक्तपणे एक अॅप तयार करत आहेत.

'सोनू फॉ यू' असे या अॅपचे नाव आहे. या अॅपद्वारे नियमित रक्तदान करणारे नागरिक गरजू व्यक्ती वा त्यांचे नातलग यांच्याशी थेट जोडले जातील. या माध्यमातून कोणाला कोणत्या गटाचे रक्त आवश्यक आहे. रक्त किती मोठ्या प्रमाणावर लागण्याची शक्यता आहे. याचा अंदाज येईल. योग्य व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात राहतील. वेळेवर गरजूंना रक्त मिळेल आणि प्राण वाचवणे शक्य होईल. 

मागणीची नोंद येताच दान करणारे संबंधित हॉस्पिटलमध्ये रक्तदान करतील. यामुळे गरजू व्यक्तीला वेळेत रक्त मिळू शकेल. रक्ताच्या अभावी प्राण जाण्याचा धोका टळेल. अॅपच्या मदतीने दुर्मिळ गटाच्या रक्ताचीही व्यवस्था वेळेवर शक्य होईल. 

अॅप प्रकल्पाचे काम सुरू असतानाच अभिनेता सोनू सूद याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सध्या तो होम क्वारंटाइन राहून वैद्यकीय उपचार घेत आहे. लवकरच बरा होऊन पुन्हा एकदा अभिनय आणि सामाजिक कार्य सुरू करेन, असा विश्वास अभिनेता सोनू सूद याने व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी