Sonu Sood : बॉलीवूडचा अभिनेता सोनू सूदने 4 पाय आणि 4 हातांनी जन्मलेल्या बिहारच्या मुलीला केली मदत - पाहा फोटो

बी टाऊन
विजय तावडे
Updated Jun 11, 2022 | 20:11 IST

Sonu Sood's social work : बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood)चार पाय आणि चार हातांनी जन्मलेल्या बिहारच्या मुलीला शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत (Sonu Sood helped little girl) केली आहे. चौमुखी कुमारी नावाच्या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे सूदने सोशल मीडियावर शेअर केले. त्याने स्वतःचे आणि चौमुखीचे फोटोही (Photos of Chaumukhi Kumari) शेअर केले आहेत. सोनू सूदने पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवत या लहान मुलीला मदत केली आहे.

Sonu Sood's social work
सोनू सूदचे परोपकारी काम 
थोडं पण कामाचं
  • चौमुखी कुमारीचा जन्म बिहारमधील एका गावात चार पाय आणि चार हातांनी झाला
  • सोनू सूदने तिला सुरतमध्ये शस्त्रक्रियेसाठी मदत केली
  • शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगण्यासाठी त्याने मुलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले

Sonu Sood helps Bihar girl : नवी दिल्ली : बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood)चार पाय आणि चार हातांनी जन्मलेल्या बिहारच्या मुलीला शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत  (Sonu Sood helped little girl) केली आहे. चौमुखी कुमारी नावाच्या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे सूदने सोशल मीडियावर शेअर केले. त्याने स्वतःचे आणि चौमुखीचे फोटोही (Photos of Chaumukhi Kumari)  शेअर केले आहेत. सोनू सूदने पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवत या लहान मुलीला मदत केली आहे. समाजातील विविध थरांमधील सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी सोनू नेहमीच पुढे सरसावतो आणि मुक्तहस्ते मदत करत असतो. त्याच्या चाहत्यांमध्येच नव्हे तर सर्वसामान्यांमध्ये याबद्दल सोनू सूदचे नेहमीच कौतुक होत असते. (Sonu Sood helped a girl in Bihar who was borne with with 4 legs and 4 arms, see pictures)

अधिक वाचा : Justin Bieber : व्हायरसमुळे जस्टिन बीबरला झाला धोकादायक आजार, पॅरालिसिसचा परिणाम झाला चेहऱ्यावर,शेअर केला व्हिडिओ

सोनू सूदने इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो

"मेरा और चौमुखी कुमारी का सफर कम्याब रहा (माझा आणि चौमुखी कुमारीचा प्रवास आता यशस्वी ठरला आहे) चौमुखीचा जन्म बिहारमधील एका छोट्या गावात चार पाय आणि चार हातांनी झाला होता. आता यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ती तिच्या घरी परतण्यासाठी तयार आहे.," असे सोनू सूदने आपल्या पोस्टमध्ये इंस्टाग्रामवर लिहिले आहे. त्याच्या या पोस्टवर युजर्सनी वेगवेगळ्या कॉमेंट्सदेखील दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

अधिक वाचा : अक्षय कुमारचं नवीन आणि तरुण हिरोईनसोबत 'काम' फ्लॉप, याचे एक उदाहरण आहे ताजे

चौमुखीचे फोटो

एका फोटोत, लहान मुलगी तिच्या शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलच्या बेडवर आराम करताना दिसत आहे. इतर दोन फोटोंमध्ये चौमुखीला आठ अंगे आहेत. त्यापैकी एक सूद मुलीशी संवाद साधताना आणि तिला टॉफी देताना दिसतो आहे. सोनू सूद यांनी "देशातील सर्वात कठीण ऑपरेशन्सपैकी एक" यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सुरतच्या किरण हॉस्पिटलचे आभार मानले.

अधिक वाचा : Salman Khan ला मारण्याचा असा फसला सगळा कट, शार्पशूटरने हॉकी बॉक्समध्ये घेतले होते हत्यार

सोनू सूदचे सेवाभावी काम

सूद हा त्याच्या परोपकारी प्रयत्नांसाठी देशभरात ओळखले जातात. तो सूद चॅरिटी फाउंडेशन चालवतो. या संस्थेचे उद्दिष्ट "वंचितांच्या जीवनात त्यांना आवश्यक साधनांसह सक्षम करून बदलणे" आणि त्यांना "निरोगी आणि उत्पादक जीवन जगण्यास मदत करणे" हे आहे. कोरोना काळात लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये सोनू सूदने स्थलांतरीत मजूरांना मोठी मदत केली होती. त्याचबरोबर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आणि औषधे पुरवण्यात देखील सोनू सूदने मोठे योगदान दिले होते. याबद्दल सोनू सूदचे सर्वच थरांतून अभिनंदन झाले होते. आपल्या परोपकारी कामांमुळे सोनू सूद नेहमीच सोशल मीडियामध्ये चर्चेत असतो.

सीबीएसई विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नाच्या वेळेसदेखील विद्यार्थ्यांनी सोनू सूदला साकडे घातले होते. सोनू सूद सोशल मीडियावर सक्रिय असतो. देशभरातील नागरिकदेखील सोनू सूदशी सोशल मीडियावर संवाद साधत असतो. प्रसंगी सोनू त्यांना प्रतिसाद देत असतो. भारतातच नव्हे तर जगभरातून लोक सोनू सूदच्या कामाची दखल घेत सोशल मीडियावर व्यक्त होत असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी