Suraj barjatya anoounced new film : सिल्व्हर स्क्रीनवर पुन्हा एकदा 'प्रेम'चा जलवा, सूरज बडजात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा

बी टाऊन
Updated Nov 10, 2022 | 21:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Salman Khan and Sooraj barjatya Upcoming Film: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि दिग्दर्शक सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) यांची जोडी सुपरहिट आहे. या दोघांनी एकत्र अनेक सिनेमांसाठी एकत्र काम केलं आहे. सलमान आणि सूरज यांनी 'ऊंचाई' या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी एक विशेष घोषणा केली. हे दोघंही लवकरच पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे.

Sooraj barjatya anoounced new film with Salman khan
पुन्हा एकदा'प्रेम' चा सिल्व्हर स्क्रीनवर जलवा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सलमान खान पुन्हा एकदा 'प्रेम'च्या भूमिकेत दिसणार आहे.
  • सूरज बडजात्या आणि सलमान पुन्हा एकत्र काम करणार आहेत.
  • 'ऊंचाई' सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान केली घोषणा

Salman Khan and Sooraj barjatya Upcoming Film: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि दिग्दर्शक सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) यांची जोडी सुपरहिट आहे. या दोघांनी एकत्र अनेक सिनेमांसाठी एकत्र काम केलं आहे. सलमान आणि सूरज यांनी 'ऊंचाई'  या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी एक विशेष घोषणा केली. हे दोघंही लवकरच पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे. (Sooraj barjatya anoounced new film with Salman khan)

अधिक वाचा : चाळीशीतील श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा प्रेम म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सूरज बडजात्या आणि सलमान खान ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. मैने प्यार किया (Maine Pyar Kiya), हम आपके है कौन (hum aapke hain kaun), हम साथ साथ है (hum sath sath hai) आणि २०१४ साली रिलीज झालेला प्रेम रतन धन पायो यासारखे सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर ही जोडी आता पुन्हा परतली आहे. खुद्द सलमान खान आणि सूरज बडजात्या यांनी याची घोषणा केली आहे.


'ऊंचाई' सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान केली घोषणा

2014 नंतर सूरज बडजात्या आणि सलमान खान एकत्र दिसले नाही. त्यामुळे चाहते त्यांच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अमिताभ बच्चन यांच्या 'ऊंचाई' सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी सलमान आणि सूरज बडजात्या एकत्र दिसले. यादरम्यान, मीडियाशी बोलताना दोघांनीही आगामी सिनेमा एकत्र करणार असल्याचं स्पष्ट केलं. एवढंच नाही तर सूरज बडजात्या यांना प्रेम व्यक्तीरेखेसह सिनेमा करणार का असं विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, 'प्रेम नक्कीच परत येईल'. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सलमानने गमतीत सांगितले की, "प्रेम येईल आणि यावेळी तो लग्नही करेल". एवढ्यावरच थांबेल तर तो सलमान खान कसला, "सूरज बडजात्या यांनी सिनेमाचं शीर्षकही रिलीज केले आहे, "सलमान की शादी" असं सांगायलाही तो विसरला नाही. 

अधिक वाचा :  'CID' स्मॉल स्क्रीनवर पुन्हा दाखल होणार?

सलमान खान आगामी 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 2023 च्या ईदला रिलीज होणार आहे. त्यानंतर 'टायगर 3'मध्ये कतरिना कैफसोबत झळकणार आहे. यासोबतच सलमान खान शाहरुख खानच्या पठाण सिनेमातही खास भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सलमान खान त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे, जो 2023 च्या ईदला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर हा अभिनेता पुन्हा टायगर 3 मध्ये कतरिना कैफसोबत दिसणार आहे. यासोबतच सलमान खान शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटातही खास भूमिका साकारणार आहे, ज्याबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी