सूरज पांचोली जिया खानचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता, जियाच्या आईचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिचा बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली शारीरिक आणि मानसिक छळ करत होता, असा गंभीर आरोप जियाची आई राबिया हिने केला आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू असताना राबियाने हा आरोप केला. 

Sooraj Pancholi was physically and mentally torturing Jiah Khan, alleged Jiah's mother
सूरज पांचोली जिया खानचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता, जियाच्या आईचा आरोप  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सूरज पांचोली जिया खानचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता
  • जियाच्या आईचा आरोप
  • मुंबईच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू असताना केला आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिचा बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली शारीरिक आणि मानसिक छळ करत होता, असा गंभीर आरोप जियाची आई राबिया हिने केला आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू असताना राबियाने हा आरोप केला. ( Sooraj Pancholi was physically and mentally torturing Jiah Khan, alleged Jiah's mother )

जियाने २०१३ मध्ये आत्महत्या केली. या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप ठेवून सूरज पांचोलीला पोलिसांनी अटक केली होती. याच प्रकरणात सुरू असलेल्या सुनावणीत जियाची आई राबिया हिने सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केला. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून सूरज पांचोलीने जियासोबतची ओळख आणि संपर्क वाढविण्यास सुरुवात केली. आधी जिया सूरजला भेटण्यास तयार नव्हती. पण सूरजने वारंवार भेटण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. अखेर जिया आणि सूरज सप्टेंबर २०१२ मध्ये पहिल्यांदा भेटले. यानंतर आणखी काही भेटी झाल्या. 

जियाने सूरज सोबत काढलेले काही फोटो मला दाखवले. हे फोटो बघितल्यामवर मी जियाकडे तू प्रेमात पडली आहेस का अशा स्वरुपाची चौकशी केली. पण जियाने सूरज हा मित्र आहे माझे त्याच्यावर प्रेम नाही, अशा स्वरुपाचे उत्तर दिले होते; अशी माहिती जियाची आई राबिया हिने न्यायालयात दिली.

ऑक्टोबर २०१२ पर्यंत जिया आणि सूरज यांच्यातील गाठीभेटी वाढल्या दोघे एकमेकांच्या घरी राहू लागले. नंतर नोव्हेंबर महिन्यात सूरजच्या एका मेसेजमुळे तर जिया प्रचंड आनंदात होती. पण काही दिवसांनी सूरज आणि जिया यांच्यात बिनसले. तणाव कमी व्हावा यासाठी सूरज आणि जिया यांनी एकमेकांना वेळ देण्याचा निर्णय घेतला. दोघे काही दिवस गोव्यात जाणार असे ठरले. ठरल्याप्रमाणे जिया सूरजसोबत गेली. पण गोव्यात सूरजने जिया समोर दुसऱ्या मुलींना फ्लर्ट करायला सुरुवात केली. गोव्यात असताना नातेसंबंध सुधारण्याऐवजी बिघडले. सूरज जियाचा मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. या छळामुळेच जिया प्रचंड अस्वस्थ झाली होती, असे जियाची आई राबिया हिने न्यायालयाला सांगितले.

कोण होती जिया खान?

नफीसा रिझवी खान उर्फ जिया खान ही अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये दीर्घ काळ राहिलेली तरुणी पुढे भारतात स्थायिक झाली होती. भारतात बॉलिवूडमध्ये ती स्वतःचे नशीब आजमावत होती. जियाने २००७ मध्ये नि:शब्द या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नंतर २००८ मध्ये जियाने आमिर खानसोबत गझनी या सिनेमातही भूमिका साकारली होती.

लागोपाठ दोन वर्ष दोन मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या जियाने नंतर दीर्घकाळ एकही सिनेमा केला नाही. जियाने ३ जून २०१३ रोजी राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप ठेवून सूरज पांचोली विरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी