Sooryavanshi Box Office | अक्षय-कॅटरिनाच्या सुर्यवंशीची' धूम सुरूच, तिसऱ्या दिवशी तोडले कमाईचे विक्रम

बी टाऊन
विजय तावडे
Updated Nov 08, 2021 | 19:34 IST

Sooryavanshi Box Office Collection | अक्षय कुमारच्या सुर्यवंशीला देशभरातील ४,००० पेक्षा जास्त स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आले आहे. तर जगभरात ५,२०० स्क्रीनवर हा चित्रपट झळकला आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटाला उशीरा का होईना चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याचा जबरदस्त फायदा झालेला दिसतो आहे.

Sooryavanshi Box Office Collection
सुर्यवंशीची तिकिटबारीवरील दणकेबाज कमाई 
थोडं पण कामाचं
  • अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांचा 'सुर्यवंशी' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट
  • पहिल्याच दिवशी अक्षय कुमारच्या सुर्यवंशी या चित्रपटाने जवळपास २६ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला
  • तिसऱ्या दिवशीच्या कमाईचा विचार करता सुर्यवंशी हा चित्रपट २५ ते २८ कोटी रुपयांचा गल्ला जमवण्याची शक्यता

Sooryavanshi Box Office Collection | मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांचा 'सुर्यवंशी' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर सुर्यवंशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी अक्षय कुमारच्या सुर्यवंशी या चित्रपटाने जवळपास २६ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला होता. तर दुसऱ्या दिवशी सुर्यवंशी या चित्रपटाने कमाईचा ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. तिसऱ्या दिवशीच्या कमाईचा विचार करता सुर्यवंशी हा चित्रपट २५ ते २८ कोटी रुपयांचा गल्ला जमवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे कोरोना महामारीमुळे जवळपास २ वर्षे असलेल्या निर्बंधांमुळे हा चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहत होता. रोहित शेट्टीच्या या चित्रपटाला उशीरा का होईना चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याचा जबरदस्त फायदा झालेला दिसून येतो आहे. (Sooryavanshi Box Office : Akshay Kumar-Katrina Kaif starrer Sooryavanshi breaks the box office collection record on 3rd day)

कोरोनाचा सुर्यवंशीला फटका

अक्षय कुमारच्या सुर्यवंशीला देशभरातील ४,००० पेक्षा जास्त स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आले आहे. तर जगभरात ५,२०० स्क्रीनवर हा चित्रपट झळकला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राबरोबरच हरियाणा आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये अद्यापदेखील चित्रपटगृहांवर असलेल्या काही निर्बंधांमुळे चित्रपटाचा गल्ला घसरला आहे. अर्थात उत्तर प्रदेश आणि दिल्ली सारख्या  राज्यांमध्येदेखील हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने चित्रपट या भागातून तिकिटबारीवरील नुकसान भरून काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय-कॅटरिनाची हिट जोडी

बॉक्स ऑफिसवरील सुर्यवंशीचे प्रदर्शन पाहता असे म्हटले जाते आहे की बॉलीवूडला कोरोना आधीच्या ८० टक्क्यांपर्यतच्या परिस्थितीत आणण्यात सुर्यवंशी जवळपास यशस्वी झाली आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ आहेत. याचबरोबर या चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंहदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतील. अक्षय कुमार आणि कॅटरिनाची जोडी याआधीही काही चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. लोकांनी ही जोडी पसंत केली असून या जोडीचे आधीचे चित्रपटदेखील हिट ठरले आहेत.

'टिप टिप बरसा पानी' या गाण्याची जादू

कॅटरिना आणि अक्षय कुमारचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट ५ नोव्हेंबरलाच देशभरात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी २६ कोटी रुपयांचा जबरदस्त गल्ला गोळा केला आहे. चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे गाणे अलीकडचे यु-ट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यातील कॅटरिना आणि अक्षय कुमारची केमिस्ट्री लोकांना आवडते आहे. विशेषत: या गाण्यात कॅटरिना खूपच हॉट दिसली असून तिच्या चाहत्यांमध्ये या गाण्याची जोरदार चर्चा आहे.

अक्षय आणि रवीनाचे सुपरहिट गाणे

'टिप टिप बरसा पानी'  हे लोकप्रिय गाणे मूलत: अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यावर मोहरा या हिट चित्रपटात चित्रीत करण्यात आले होते. हे गाणे बॉलीवूडच्या सुपरहिट गाण्यांपैकी आहे. या गाण्यात रवीना टंडन कमालीची हॉट दिसली आहे. त्यामुळे कॅटरिनासमोर या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स देण्याचे आव्हान होते. कॅटरिनाने हे आव्हान पेलेले आहे. अक्षय कुमार आणि कॅटरिनाची जोडी लोकांनी पसंत केली आहे. 'टिप टिप बरसा पानी'  हे गाणे बॉलीवूडमधील सार्वकालिक हॉट गाण्यांमध्ये गणले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी