Sooryavanshi 'सूर्यवंशी' सिनेमाने केली घसघशीत कमाई, ओलांडला १०० कोटींचा टप्पा

'Sooryavanshi' crosses Rs 100 crore mark amid pandemic रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' या सिनेमाने घसघशीत कमाई केली. या सिनेमाने १०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला. 

'Sooryavanshi' crosses Rs 100 crore mark amid pandemic
'सूर्यवंशी' सिनेमाने केली घसघशीत कमाई, ओलांडला १०० कोटींचा टप्पा 
थोडं पण कामाचं
  • 'सूर्यवंशी' सिनेमाने केली घसघशीत कमाई, ओलांडला १०० कोटींचा टप्पा
  • 'सूर्यवंशी' या सिनेमाने अवघ्या पाच दिवसांत १०२.८१ कोटी रुपयांची कमाई केली
  • अल्पावधीत सिनेमा आणखी मोठ्या प्रमाणावर कमाई करण्याची शक्यता

'Sooryavanshi' crosses Rs 100 crore mark amid pandemic । मुंबईः रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' या सिनेमाने घसघशीत कमाई केली. या सिनेमाने १०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला. 

'सूर्यवंशी' हा हिंदी सिनेमा रोहित शेट्टी, अरुण भाटिया, हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता यांची संयुक्त निर्मिती आहे. सिनेमाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. अक्षय कुमार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. 

दहशतवाद्यांची मुंबईत घातपात करण्याची योजना असते. ही योजना मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाचे डीसीपी वीर सूर्यवंशी (अक्षय कुमार), त्यांच्या टीमचे सदस्य संग्राम भालेराव (रणवीर सिंग) आणि डीसीपी बाजीराव सिंघम (अजय देवगण) यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक कशी उद्ध्वस्त करते त्याची कथा म्हणजे 'सूर्यवंशी' हा हिंदी सिनेमा. 

कोरोना संकटामुळे 'सूर्यवंशी' सिनेमा प्रदर्शित करण्याचा दिवस एक वर्षापेक्षा जास्त काळासाठी पुढे ढकलण्यात आला. अखेर कोरोना संकट नियंत्रणात येत असल्याचे पाहून महाराष्ट्रात सिनेमाचे शो सुरू झाले. 'सूर्यवंशी' हा सिनेमा ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. एकाचवेळी अनेक स्क्रीनवर सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय झाला. या निर्णयाचा फायदा झाला. एका आठवड्यात या सिनेमाने १०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला. 

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मिळत असलेला प्रतिसाद बघता अल्पावधीत सिनेमा आणखी मोठ्या प्रमाणावर कमाई करण्याची शक्यता आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनचे पहिल्या पाच दिवसांचे आकडे जाहीर झाले आहेत. या आकडेवारीनुसार 'सूर्यवंशी' या सिनेमाने अवघ्या पाच दिवसांत १०२.८१ कोटी रुपयांची कमाई केली. 

सिनेप्रेमींचा भरभरुन प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून रोहित शेट्टीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. या पोस्टद्वारे रोहित शेट्टीने देशातील सिनेमा चाहत्यांचे जाहीर आभार मानले.

रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेला 'सूर्यवंशी' हा नववा सिनेमा आहे ज्याने १०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला आहे. याआधी सिंघम, सिम्बा या सिनेमांनीही १०० कोटीरुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी