Tamannaah Bhatia: बाहुबली फेम तमन्ना भाटिया अडकणार लग्नबंधनात, 'या' बिझनेसमनसोबत होणार विवाहबद्ध

बी टाऊन
Updated Nov 17, 2022 | 16:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tamannaah Bhatia to get marry : साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनय आणि सौंदर्याने साऱ्यांनाच थक्क करणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. तमन्ना लवककच लग्न करणार आहे. तमन्ना भाटिया मुंबईतील एका बिझनेसमनसोबत लग्न करणार आहे. आणि त्यामुळेच तमन्ना कोणत्याही प्रोजेक्टवर साइन करण्यास नकार देत असल्याचं म्हटलं जात आहे.

South Actress Tamannaah Bhatia to get marry with busineesman
तमन्ना भाटिया लग्नबंधनात अडकणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तमन्ना भाटिया लग्नबंधनात अडकणार
  • बिझनेसमनसोबत होणार विवाहबद्ध
  • तमन्ना भाटियाने घेतला कामातून ब्रेक

Tamannaah Bhatia to get marry : साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनय आणि सौंदर्याने साऱ्यांनाच थक्क करणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाने  (Tamannaah Bhatia) चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. तमन्ना लवककच लग्न करणार आहे. तमन्ना भाटिया मुंबईतील एका बिझनेसमनसोबत लग्न करणार आहे. आणि त्यामुळेच तमन्ना कोणत्याही प्रोजेक्टवर साइन करण्यास नकार देत असल्याचं म्हटलं जात आहे. (South Actress Tamannaah Bhatia to get marry with busineesman)

अधिक वाचा : ... आता अपेक्षा 'दृष्यम 2'कडून

साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनय आणि सौंदर्याने साऱ्यांनाच थक्क करणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ही ब्युटी क्वीन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बिझनेसमनसह तमन्ना विवाहबद्ध होणार आहे. लवकरच ती लग्न करणार आहे, त्यामुळे ती सध्या कोणत्याही प्रोजेक्टवर साइन करत नसल्याचं म्हटलं जात आहे. सध्या ती तिच्या लग्नाच्या तयारीत बिझी आहे. त्यामुळे तिने कामातून काही वेळ ब्रेक घेतला आहे. 


बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर अभिनेत्रीने मुंबईतील प्रसिद्ध तरुण उद्योगपतीला होकार दिला आहे. अजूनही त्यांनी आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, आता ती लवकरच चाहत्यांना तिच्या लग्नाबद्दल सांगेल अशी अपेक्षा आहे. लग्नाबद्दल बोलायचे झाले तर तमन्नाचे आई-वडीलच लग्न कुठे आणि केव्हा करायचे हे ठरवणार आहेत.दुसरीकडे, तमन्ना भाटिया म्हणते की जर तिचे लग्न झाले तर तिला तिच्या लग्नाला थोडा वेळ द्यायला आवडेल. तमन्नाने वयाच्या 14 व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली आहे. 

अधिक वाचा :  लहान मुलांना सांभाळत कमाई करण्याचे पर्याय

वर्कफ्रंटबद्दल  बोलायचे झाले तर तमन्ना भाटिया 'बाहुबली', 'केजीएफ चॅप्टर 1', 'बाहुबली 2', 'भोला शंकर', 'अॅक्शन', 'बबली बाउन्सर', 'एंटरटेनमेंट' यांसारख्या अनेक बिग बजेट सिनेमांमध्ये दिसली आहे. साऊथ इंडस्ट्रीतील ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक रिएलिटी शोमध्येही तमन्ना दिसली होती. प्रेम आणि अफेअरबद्दल बोलताना तिचे नाव विराट कोहलीसोबत जोडले गेले होते. आता अभिनेत्री एका बिझनेसमनशी लग्न करणार आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. मात्र, अद्याप तमन्नाने अधिकृत माहिती दिलेली नाही त्यामुळे चाहते आता त्याचीच वाट पाहात आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी