Bollywood News: बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ते ओळखण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. आजवर अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे बालपणीचे फोटो (Celebrity Photo) शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर दोन वेण्या घालून स्कूल युनिफॉर्ममधल्या चिमुरडीचा फोटो व्हायरल होत आहे. या चिमुरडीने आमीरसोबत (Amir Khan) सिल्व्हर स्क्रीन शेअर केली आहे. तुम्ही तिला ओळखलंत का? (south superstar Asin Thottumkal childhood photo in ponytail goes viral share screen with Amir khan)
अधिक वाचा : फोनवर बोलण्यास नकार दिला म्हणून तरुणीला जिवंत जाळले
दोन वेण्या घातलेली आणि स्कूल युनिफॉर्ममधली ही चिमुरडी एकेकाळच्या बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांची अभिनेत्री आहे तुम्ही तिला ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, की आहे बॉलिवूड आणि साऊथची सुपरस्टार असीन थोट्टूमकल. 2008 मध्ये गजनी सिनेमात आमीर खानसोबत झळकली होती. या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर सुपरहिट ठरला त्याचप्रमाणे सिनेमातील असिनचे कामही लोकांना आवडले. या सिनेमांनंतर असिनने खिलाडी 786, रेडी, बोल बच्चन, हाउसफुल 2 या सिनेमांमध्ये काम केलं. बोल बच्चन सिनेमात असीनची भूमिकाही साऱ्यांनाच भावली होती. एक चुलबुली अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.
अधिक वाचा : पंकजा मुंडेंना मंत्रिपद नाही ते नाही, परिषदही नाही?
त्यानंतर मात्र, 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्मासोबत तिने लग्न केले. लग्नानंतर तिने बॉलिवूड सिनेमांना राम राम केला. आता ती तिच्या पतीसह त्याला व्यवसायात मदत करते. राहुल आणि असीन अक्षय कुमारमुळे एकमेकांच्या संपर्कात आल्याचं म्हटलं जातं.