याला म्हणतात खरा हिरो, चाहत्याच्या निधनानंतर कुटुंबीयाला अभिनेत्याकडून लाखो रुपयांची मदत

बी टाऊन
Updated Feb 13, 2020 | 13:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ram Charan's Charity: साऊथचा सुपरस्टार असलेला अभिनेता राम चरण यांनी नुकतीच त्यांच्या एका फॅन नूर मोहम्मदच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्यांच्या फॅनचं निधन झालं होतं. वाचा सविस्तर.

south superstar ram charan's charity for a deceased fan's family is all the humanity we need
Ram Charan's Charity: दोन महिन्यापूर्वी मृत पावलेल्या फॅनच्या कुटुंबाला साऊथ सुपरस्टार राम चरणकडून आर्थिक मदत 

थोडं पण कामाचं

  • साऊथ सुपरस्टार राम चरण यांनी केली फॅनच्या कुटुंबाला आर्थिक मदत
  • गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फॅनचं झाला होतं निधन
  • दहा लाखाचा चेक देऊन केली मोठी मदत

मुंबई: प्रत्येक सेलिब्रिटीसाठी जितकं फेम महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं असतं त्यांच्या फॅन्सकडून मिळणारं प्रेम. या सेलिब्रिटींचे फॅन्स त्यांची खूप मोठी ताकद असतात. त्याचसोबत त्यांची कुठेतरी ओळख सुद्धा बनून जातात. अनेकदा हे फॅन्स विविध गोष्टी आपल्या आवडत्या सेलेब्ससाठी करताना दिसतात. एवढंच नाही तर कधीकधी असं काही करून जातात की सगळेच चाट पडतात. पण अशीच एखादी गोष्ट एखाद्या सेलेब्रिटीने आपल्या फॅनसाठी केली तर ते नक्कीच कौतुकास्पद असेल. साऊथ सुपस्टार असलेल्या अभिनेता राम चरण यानी सुद्धा नुकतीच अशीच एक गोष्ट केली आहे.

नूर मोहम्मद नावाचा राम चरण यांचा खूप मोठा फॅन होता. राम चरण सारखाच चिरंजीवी आणि अल्लू अर्जुन यांचा सुद्धा खूप मोठा फॅन होता. यांनी अनेकदा त्यांच्या या आवडत्या सेलेब्रिटींसाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या दिसून आल्या. याच खूप मोठा फॅन असलेला नूर मोहम्मद यांचं गेल्यावर्षी ८ डिसेंबर रोजी निधन झाले. साऊथ इंडस्ट्रीमध्ये नूर मोहम्मद तसे फॅन म्हणून फार प्रसिद्ध होते आणि म्हणूनच त्यांच्या निधनावर साऊथ इंडस्ट्रीतल्या अनेक सेलेब्सने दुःख व्यक्त केलं. सोशल मीडियावर त्यांच्या निधनासाठी शोक व्यक्त करणाऱ्या अनेक पोस्ट सुद्धा बघायला मिळाल्या. खुद्द अभिनेता राम चरण यांनी सुद्धा अशी एक पोस्ट टाकली होती. त्याच वेळेला रामचरण आणि अल्लू अर्जुन यांनी नूर मोहम्मद यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचं म्हंटलं होतं. आता मात्र आपला शब्द राखत अभिनेता राम चरण यांनी नूर मोहम्मद यांच्या परिवाराला भेटून आर्थिक मदत दिली आहे असं समजतंय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#MegaPowerStar #RamCharan met and donated 10lakhs to Sr.#Mega fan #NoorMohammed gari family who recently expired. #Charan

A post shared by Chirufanclub (@megastarchiranjeevifc) on

 

राम चरण यांनी नुकतीच नूर यांच्या परिवाराची भेट घेतली आणि त्यांना दहा लाख रुपयांचा चेक दिला. तसंच त्यांच्या दुःखाच्या प्रसंगात त्यांना शक्य ती मदत करण्याचाही शब्द दिला आहे. राम चरण यांनी नूर यांच्या कुटुंबासोबत काही वेळ सुद्धा घालवला ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. यावर अनेक फॅन्स राम चरण यांचं कौतुक करताना दिसत आहेत.

 

 

याआधी सुद्धा रामचरण यांनी मनाचा मोठेपणा दाखवला होता. नूर मोहम्मद यांच्या निधनाच्या दोन दिवसानंतर म्हणजे 10 डिसेंबर 2019 रोजी चेन्नईमध्ये राम चरण यांना ‘The People’s Entertainer Par Excellence Award’ याने गौरवण्यात आलं होतं. हा पुरस्कार त्यांनी आपला सगळ्यात मोठा फॅन असलेल्या नूर यांना समर्पित केला होता. त्या वेळेला ते भावुक सुद्धा झाले होते आणि म्हणाले होते की आम्ही आमच्या फॅन्स मुळेच आहोत. पुढे असं सुद्धा म्हणाले होते की, ‘नूर एक खूप उत्तम माणूस होते आणि गेल्या बारा वर्षांपासून मला आणि माझ्या वडिलांना इन्स्पायर करत होते, जेव्हा पासून मी अभिनेता झालो आहे, तेव्हापासून. नूर मोहम्मद माझ्या फॅन्स मध्ये सगळ्यात जुने फॅन होते, त्यांचं निधन झालं आहे. मला असं वाटतं की हा अवॉर्ड त्यांनी मला दिला आहे. हा मी त्यांना समर्पित करतो. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो सर, आम्हाला तुम्ही कायम आठवत राहाल.’

 

 

यासोबतच नूर यांच्या निधनानंतर राम चरण यांनी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत पोस्ट केली होती याचं कॅप्शन होतं, "फॅन्स हे परिवार असतात नूरजी पॉझिटिवीटीने भरलेले होते आणि त्यांच्या मदत करण्याच्या स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी युवा पिढीला खूप प्रेरित केलं आहे.”

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी