Vijay Deverakonda home : 'या' साऊथ सुपरस्टारचे घर अतिशय सुंदर असून बारपासून बेडरूमपर्यंत प्रत्येक कोपरा न कोपरा आहे आलिशान

बी टाऊन
Updated Jul 23, 2022 | 00:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vijay Deverakonda home : साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या अभिनयासोबतच लूक आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. आज तो साऊथच्या टॉप स्टार्सपैकी एक आहे. अर्जुन रेड्डी या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले. आज त्याच्याकडे सर्व काही आहे. अभिनेत्याने हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये एक सुंदर घर विकत घेतले आहे ज्यामध्ये विजय त्याच्या संपूर्ण कुटुंबासह राहतो.

South superstar vijay deverakonda's house is very luxurious
विजय देवरकोंडाचे आलिशान घर  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • विजय देवरकोंडाचे सुंदर आणि आलिशान घर
  • घराची किंमत सुमारे 15 कोटीच्या आसपास आहे
  • विजय देवरकोंडाने घराचे फोटो सोशल मीडियावर केले शेअर

Vijay Deverakonda home : साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या अभिनयासोबतच लूक आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. आज तो साऊथच्या टॉप स्टार्सपैकी एक आहे. अर्जुन रेड्डी या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले. आज त्याच्याकडे सर्व काही आहे. अभिनेत्याने हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये एक सुंदर घर विकत घेतले आहे ज्यामध्ये विजय त्याच्या संपूर्ण कुटुंबासह राहतो. (South superstar vijay deverakonda's house is very luxurious)

विजय देवरकोंडा यांचे घर हैदराबादच्या सर्वात महागड्या भागात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या या आलिशान घराची किंमत सुमारे 15 कोटी आहे. वडील देवराकोंडा गोवर्धन राव, आई माधवी आणि भाऊ आनंद देवराकोंडा यांच्यासोबत विजय देवरकोंडा या घरात राहतो. विजयचा भाऊ आनंद देखील एक अभिनेता आहे. याशिवाय त्याचा सायबेरियन हस्की डॉगही या घरात राहतो.


विजयने लॉकडाऊन दरम्यान त्याच्या घराचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचे घर अतिशय आलिशान आणि सुंदर आहे यात शंका नाही. विजयच्या घरात बार कॉर्नर आणि एक मोठा हॉलसुद्धा आहे. या अभिनेत्याने घराच्या सजावटीवर खूप पैसा खर्च केला आहे. 


विजय देवरकोंडाच्या लिव्हिंग रुममध्ये त्याच्या 'अर्जुन रेड्डी' चित्रपटाचे पोस्टर आहे. साऊथच्या हँडसम हंकचे हे घर खरोखरच सुंदर आहे.

विजय देवरकोंडाच्या पाळीव कुत्र्याबद्दल बोलायचे झाले तर तो जवळपास प्रत्येक फोटोत त्याच्यासोबत दिसतो. यावरून त्यांचे बॉन्डिंग स्पष्टपणे दिसून येते.त्याच्या घराची बाल्कनी खूप मोठी आणि सुंदर आहे, तिथे एल शेपचा सोफा आहे. कलाकार त्यांचा जास्तीत जास्त वेळ इथे घालवतात. 


विजय देवरकोंडा लवकरच अनन्या पांडेसोबत 'लाइगर' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी