Spider-Man No Way Home Day 1 box office collection : 'स्पायडरमॅन'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्याच दिवशी 35 कोटींची कमाई

बी टाऊन
Updated Dec 17, 2021 | 14:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Spiderman No Way Home, box office collection : स्पायडरमॅन या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 35 कोटींपेक्षाही जास्त कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.

Spider-Man No Way Home Day 1 box office collection
'स्पायडरमॅन-नो वे होम'ची जादू चालली, 35 कोटींचा आकडा पार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'स्पायडरमॅन-नो वे होम'ने तोडला एव्हेंजर्सचा रेकॉर्ड?
  • पहिल्याच दिवशी 35 कोटींची कमाई
  • भारतात 3264 स्क्रीनवर रिलीज झाला सिनेमा

Spider-Man No Way Home Day 1 box office collection : मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा नवीन चित्रपट 'स्पायडरमॅन: नो वे होम'ने बॉलिवूड स्टार्स जे करू शकले नाही ते केले आहे. या चित्रपटाने ओपनिंगलाचा धमाका केला आहे. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 'स्पायडरमॅन: नो वे होम' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईने 35 कोटींचा आकडा पार केला आहे. ही आकडेवारी बदलू शकते. पुढच्या आठवड्यात बॉक्सऑफिसवर 83 आणि जर्सी हे दोन क्रिकेटवर आधारित सिनेमा रिलीज होणार आहेत. स्पायडरमॅनचा या सिनेमावर परिणाम होणार का ते कळेलंच. 

Spider-Man: No Way Home' joins 'Avengers: Endgame' to record fastest advance ticket sales at Indian box office | English Movie News - Times of India

83' चित्रपटाच्या एक आठवडा आधी रिलीज झालेल्या 'स्पायडरमॅन: नो वे होम'  या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसची गणितं बदलली आहेत.देशात आतापर्यंत रिलीज झालेल्या इंग्रजी चित्रपटांपैकी हा चित्रपट सर्वाधिक चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. गुरुवारपर्यंत ही फिल्म देशातील ३२६४ स्क्रीन्सवर दाखवली जात आहे.
आणि रविवारपर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता हिंदी चित्रपट निर्मात्यांची झोप उडाली आहे. गुरुवारीच या चित्रपटाने देशात आतापर्यंत रिलीज झालेल्या 
हॉलिवूड चित्रपटांमध्ये पहिल्या दिवशी केलेल्या कमाईत दुसरा क्रमांक पटकावला.

Spider-Man: No Way Home' trailer: The internet is convinced they found Tobey Maguire and Andrew Garfield's scenes in the Tom Holland-starrer, thanks to spoilers | English Movie News - Times of India


याआधी रिलीज झालेल्या टॉम हॉलंडच्या स्पायडरमॅन चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला आहे पण 'स्पायडरमॅन : नो वे होम' या चित्रपटाची गोष्ट काही औरच आहे. चार वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'स्पायडरमॅन होमकमिंग' या सिनेमानो भारतात पहिल्याच दिवशी ९.३६ कोटींची कमाई केली होती. यानंतर रिलीज झालेला 'स्पायडरमॅन फार फ्रॉम होम' चित्रपट म्हणावी तितकी कामगिरी करू शकला नव्हता. पण 'स्पायडरमॅन : नो वे होम या चित्रपटाने थेट देशात रिलीज झालेल्या हॉलिवूडच्या टॉप 10 ओपनर्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

Spider-Man: No Way Home Critics Review: Critics and fans hail Tom Holland starrer for 'emotional' plot; call it 'best Marvel movie yet'


भारतात रिलीज झालेल्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये सर्वात मोठी ओपनिंग करण्याचा विक्रम अजूनही मार्वलच्या 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' या चित्रपटाच्या नावावर आहे, अँव्हेंजर्सने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 2019 मध्ये 53.10 कोटी रुपयांची कमाई केली होती.'अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या चित्रपटाने वर्षभरापूर्वी बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्याच दिवशी 31.30 कोटींची कमाई केली होती. या यादीतील तिसरा क्रमांक 'हॉब्स अँड शॉ' आहे, ज्याने भारतात 13.15 कोटी रुपयांची कमाई केली होती. 

Spider-Man: No Way Home' trailer smashes 'Avengers: Endgame' record in 24 hours | English Movie News - Times of India


'स्पायडरमॅन : नो वे होम चित्रपटाने पहिल्या दिवशीच्या कमाईने   'फास्ट अँड फ्युरियस प्रेझेंट्स हॉब्स अँड शॉ' चित्रपटाला मागे टाकले आहे. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या हेच दिसत आहे. आतापर्यंत या सिनेमाने 35 कोटींच्यावर कमाई केल्याचं दिसत आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी