खुशी कपूरने इंस्टाग्राम अकाउंट केले पब्लिक, पाहा तिचे भन्नाट फोटो

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूरनेही तिचे इंस्टाग्राम अकाउंट पब्लिक केले आहे. पाहा खुशी कपूरचे खास फोटो

khushi kapoor
खुशी कपूरने इंस्टाग्राम अकाउंट केले पब्लिक, पाहा तिचे भन्नाट फोटो  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • खुशी कपूरने तिचे इंस्टाग्राम अकाउंट सार्वजनिक केले.
  • खुशीच्या फॉलोवर्सची संख्या 1 लाखांपेक्षा अधिक आहे
  • खुशीच्या इन्स्टाग्राम फोटोंमध्ये तिची वेगळी आणि ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळते 

मुंबई: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा नंतर आता दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर हिने देखील तिचे इंस्टाग्राम अकाउंट पब्लिक केले आहे. खुशीचे इंस्टाग्राम अकाउंट व्हेरिफाईड देखील झाले आहे. सध्या तिचे १ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

खुशीचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. ती बर्‍याचदा आई श्रीदेवी सोबतचे फोटो शेअर करुन तिच्या आठवणींना देखील उजाळा देत असते. ऑगस्टमध्ये तिने तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती श्रीदेवीच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना खुशीने लिहिले की, 'मिस यू'. याशिवाय ती तिच्या पालकांचे थ्रोबॅक फोटो देखील नेहमी शेअर करते. 

खुशी तिची मोठी बहीण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर आणि चुलत बहीण शनाया कपूरसोबतचेही अनेक फोटो पोस्ट करत असते. खुशीने शेअर केलेल्या फोटोमधून हे दिसून येते की, ती आधीपेक्षा आता खूप बदलली आहे. खुशीचे जुने फोटो पाहिल्यास असे दिसून येत आहे की, तिने तिच्या ओठांची शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. या सर्व फोटोंमध्ये खुशीचा ग्लॅमरस लूक आपल्याला पाहायला मिळत आहे.

अलीकडेच खुशीने तिच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलली होती. तिने सांगितले होते की लोक लहानपणी तिची चेष्टा करायचे. तिच्या लूकमुळे लोक तिच्यावर बऱ्याचदा भाष्य करायचे. खुशी म्हणाली की, ती लहान असताना तिच्या लुकबद्दल असुरक्षित होती. लोकांच्या क्षुद्र टिप्पण्यांनी तिचा प्रभावित झाली होती. लोक तिला सांगायचे की ती तिची आई श्रीदेवी किंवा बहीण जान्हवी कपूरसारखी दिसत नाही.

त्याचवेळी करण जोहरचा टीव्ही शो कॉफी विद करणमध्ये खुशीचा भाऊ आणि अभिनेता अर्जुन कपूरने खुलासा केला की खुशी घरातील सर्वात लाडकी मुलगी आहे. सध्या खुशी ही न्यूयॉर्कमध्ये शिकत आहे. परंतु कोविड-१९ च्या संसर्गामुळे ती मायदेशी परतली आहे. त्यामुळे गेले अनेक महिने ती भारतातच वास्तव्यस आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी