Bollywood News : 'या' अभिनेत्रीच्या मुलीचे बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून चाहतेही घायाळ

बी टाऊन
Updated Aug 18, 2022 | 18:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bollywood News :जान्हवी कपूरची ( Jahnvi Kapoor ) बहीण खुशी कपूर(Khushi Kapoor) चित्रपटांपासून दूर असली, तरी ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांना अपडेट्स देत असते.

Sridevi's daughter Khushi Kapoor Bold Photoshoot Viral on Social Media
खुशी कपूरचे बोल्ड फोटोशूट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • खुशी कपूरचे बोल्ड फोटोशूट
  • खुशी कपूरच्या अदांनी चाहते घायाळ
  • खुशी कपूर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते आणि चाहत्यांना अपडेट्स देत असते

Khushi Kapoor bold photoshoot : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्या दोन्ही मुली अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहेत. अभिनेत्रीची मोठी मुलगी जान्हवी कपूरने  (Janhvi Kapoor) फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. त्याचवेळी श्रीदेवीची लाडकी खुशी कपूर (Khushi Kapoor)  चित्रपटांपासून दूर असावी. ( Sridevi's daughter Khushi Kapoor Bold Photoshoot Viral on Social Media )

 

अधिक वाचा : रायगडमध्ये दोन संशयास्पद बोट आढळल्या


खुशी बहिण जान्हवीपेक्षा जास्त बोल्ड आहे

दुसरीकडे, खुशी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आता पुन्हा एकदा खुशीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. या लूकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे, की तिच्यावरून नजर हटवणे कठीण झाले आहे.

अधिक वाचा :  आडनाव हटवल्यानंतर चहलची पत्नी असं काही म्हणाली की....


खुशीने बोल्ड फोटोशूट केले

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये खुशीने हिरव्या रंगाची बिकिनी घातलेली दिसत आहे. यासोबत तिने मल्टीकलर ड्रेस वेअर केला आहे. या फोटोशूटमुळे खुशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खुशीने शेअर केलेल्या या फोटोंना आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत.


खुशी लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 2019 मध्ये, तिने न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे आणि आता तिला ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सहभागी व्हायचे आहे.

अधिक वाचा :  सूरज पांचोली जिया खानचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता

सोशल मीडियावर खुशी कपूर सक्रीय असते

याआधीही खुशी कपूरने तिचे फोटो इंस्टाग्राम साईटवर अपलोड केलेले आहेत. श्रीदेवीची ही मुलगी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जान्हवी कपूरपेक्षा बोल्ड असलेली खुशी सोशल मीडियावर कायम पोस्ट करून तिच्या चाहत्यांना अपडेट्स देत असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी