SRK Net Worth In Rupees; सलमान,आमिरपेक्षा खूप श्रीमंत आहे Shah Rukh Khan, एका दिवसाला कमावतो इतके कोटी रूपये

बी टाऊन
Updated Nov 02, 2022 | 10:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

SRK Net Worth In Rupees : शाहरूख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत आहे. तो प्रॉपर्टीच्या बाबतीत सलमान खान आणि आमिर खानपेक्षाही पुढे आहे 

shah rukh khan
Shah Rukh Khan एका दिवसाला कमावतो इतके कोटी रूपये 
थोडं पण कामाचं
  • बिझनेस एपेकच्या रिपोर्टनुसार शाहरूख बॉलिवूडचा प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे
  • किंग खानची एका दिवसाची कमाई तब्बल 1.4 कोटी रूपये आहे. 
  • शाहरूख खानची एकूण नेटवर्थ 5 हजार 593 कोटी रूपये आहे. 

मुंबई: बॉलिवूड तीन खान म्हणजेच शाहरूख खान(Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांचेच राज्य चालते. तीनही खानांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेाहेत. जर तीनही खानांच्या प्रॉपर्टीबाबत बोलायचे झाल्यास शाहरूख खान या बाबतीत पुढे आहे. किंग खान सलमान खान आणि आमिर खानपेक्षा श्रीमंत आहे. जाणून घ्या बॉलिवूडचा बादशाह एका दिवसाला किती कमावतो. 

अधिक वाचा - ... म्हणून सलमान खानला Y+ सिक्युरिटी

तीन खानांमध्ये श्रीमंत आहे शाहरूख खान

बिझनेस एपेकच्या रिपोर्टनुसार शाहरूख बॉलिवूडचा प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे. किंग खानची एका दिवसाची कमाई तब्बल 1.4 कोटी रूपये आहे. 
शाहरूख खानची एकूण नेटवर्थ 5 हजार 593 कोटी रूपये आहे. 
डीएनएच्या रिपोर्टनुसार सलमान एक दिवसांत तब्बल 1 .01 कोटी कमावतो आणि त्याची नेटवर्थ 60 मिलियन डॉलर म्हणजेच 2900 कोटी रूपये आहे. 
बॉलिवूडचा तिसरा खान आमिर खानची एका दिवसाची कमाई तब्बल 33.47 लाख इतकी आहे आणि त्याची नेटवर्थ 225 मिलियन म्हणजेच 1800 कोटी रूपये आहे. म्हणजेच तीन खानांमध्ये सर्वात जास्त श्रीमंत शाहरूख खान आहे. 

शाहरूख खानची देशविदेशात प्रचंड संपत्ती

शाहरूख खानची स्वत:ची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आहे ज्याच्या बॅनरखाली अनेक सिनेमे बनतात आणि त्यातून खूप कमाई होते. याशिवाय तो कोलकाता नाईट रायडर्सचा को ऑनर आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट हे आपल्या देशात प्रचंड लोकप्रिय अशी क्षेत्रे आहेत आणि SRK या दोन्हींचा बादशाह आहे. त्याच्याकडे मुंबईशिवाय दुबईमध्येही त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. 

अधिक वाचा - तुमच्या डिमॅट खात्यातही होऊ शकते फसवणूक, अशी घ्या काळजी

एका सिनेमासाठी घेतो इतके कोटी

शाहरूख खान आणि त्याचे संपूर्ण कुटुंबीय प्रचंड लक्झरी लाईफ जगतो. शाहरूख खानपासून ते पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, मोठा मुलगा आर्यन खान आणि छोटा मुलगा अबराम सर्व लोकांची लाईफस्टाईल खूप क्लासी आहे. मीडिया रिपोर्टनुसार शाहरूख खान एका सिनेमासाठी 50 से 55 कोटी रूपये घेतो. तसेच ब्रँड्सच्या प्रमोशनसाठी आणि जाहिरातींसाठी 20 कोटी रूपये घेतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी