सुहाना खानचा 'हा' नवा फोटो होतोय व्हायरल, कारण की... 

बी टाऊन
Updated Sep 19, 2019 | 01:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना ही मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आता ती पुन्हा एकदा आपल्या एका ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे. 

suhana_khan insta
सुहाना खान  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेता शाहरुख खानची कन्या सुहाना खान हिचा एक सुंदर फोटो आता समोर आला आहे.
  • सुहाना खान ही या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
  • सध्या सुहाना ही आपल्या उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्कमध्ये आहे.

न्यूयॉर्क: बॉलिवूड किंग खानची कन्या सुहाना खान ही बॉलिवूडमध्ये येण्याआधीच चर्चेचा विषय बनली आहे. सुहानाची प्रत्येक गोष्ट सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेत येत आहे. आता सघ्या सुहानाच्या एका फोटोची सोशल मीडियामध्ये चर्चा रंगली आहे. तिचा हा फोटो व्हायरल देखील होत आहे. तसं पाहिल्यास तिचा फोटो खूपच ग्लॅमरस असल्याचं आपल्याला दिसतं. स्टार किड्समध्ये सुहाना खान ही सोशल मीडियावर खूपच पॉप्युलर असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. 

सुहाना ही आपल्या गर्ल गँगसोबत असो की, एकटी तिचे प्रत्येक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. तिचा नुकताच एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तिने एक सुंदर स्माइल दिली आहे. त्यामुळे तिचा हा फोटो खूपच ग्लॅमरस वाटतोय. 

या फोटोमध्ये सुहानाने ब्राउन कलरचा टॉप परिधान केला आहे. यावेळी तिच्या हातात पैसे देखील आहेत. याचवेळी ती काही तरी विचार करत स्वत: मध्येच हरवल्याची दिसते आहे. दुसरीकडे सुहानाच्या या फोटोवर तिचे चाहते सतत कमेंट्स करत आहेत. कुणी तिला सुंदर म्हणत आहे तर कुणी तिला आकर्षक म्हणत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I caught my self smiling and then I realized I was thinking about you My babe suee #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS) (@suhanakha2) on

याआधी सुहानाची आई गौरी खान हिने सुहानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती तिच्या कॉलेजच्या पहिल्याच दिवशी राणी मुखर्जीसारखी एंट्री मारत असल्याचं दिसून आलं. तिचा हा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. 

दरम्यान, हे काही पहिल्यांदा नाही की, सुहानाचा फोटो व्हायरल झाला आहे. याआधीही तिचे अनेक फोटो हे सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. सुहानाने आपलं ग्रॅज्युएशन काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमधील आर्डिंग्ली विद्यापीठातून पूर्ण केलं आहे. इंग्लंडमध्ये असताना देखील सुहाना आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करायची. 

इंग्लंडमध्ये शिकत असतानाचा सुहानाने एका नाटकात देखील काम केलं होतं. त्यामुळे यासाठी तिला विद्यापीठाकडून रसेल कॅप देखील मिळाली होती. तिच्या तेथील पदवीदान सोहळ्यासाठी स्वत: शाहरुख आणि गौरी दोघेही हजर होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी