SOTY 2: स्टुडंट ऑफ द इयर-२ ची बॉक्स ऑफिसवर हाफ सेन्चुरी

बी टाऊन
Updated May 16, 2019 | 16:08 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Student of the year 2 box office: टायगर श्रॉफचा स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसापासून सलग पाचव्या दिवसापर्यंत या सिनेमानं चांगली कमाई केली आहे.

student of the year 2
SOTY 2: स्टुडंट ऑफ द इयर-२ बॉक्स ऑफिसवर सुसाट 

Student of the year 2 box office collection: टायगर श्रॉफचा स्टुडंट ऑफ द इयर- २ हा सिनेमा पहिल्या दिवसापासून दमदार कमाई करत आहे. सिनेमानं पहिल्या दिवशी १२.०६ कोटींची कमाई केली. या कमाईच्या तुलनेत टायगर श्रॉफचा बागी २ च्या फर्स्ट डे कलेक्शनचं खूप कमी आहे. बागी २ नं २५.१० कोटींची ओपनिंग केली होती. मात्र आता स्टुडंट ऑफ द इयर - २ सिनेमानं बॉफ ऑफिसवर हाफ सेन्चुरी केली आहे. आतापर्यंत सिनेमानं ५३.८८ कोटींचं कलेक्शन केलं आहे.  हा सिनेमा प्रेक्षकांना हळूहळू भावत आहे. 

जर का येत्या दिवसात या सिनेमाला चांगल्या संख्येनं प्रेक्षक मिळाले नाही तर हा सिनेमा १०० कोटींचा पल्ला गाठू शकणार नाही. दिल-दोस्ती- डान्सनं भरलेला हा सिनेमानं अपेक्षेप्रमाणं कमाई केली नाही आहे. रिव्ह्यूबद्दल बोलायचं झाल्यास टाइम्स नाऊनं २.५ स्टार दिले आणि सिनेमा सामान्य असल्याचं म्हटलं आहे. 

२०१९ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास २१.६० कोटी रूपयांचं  कलेक्शन करत कलंक या सिनेमानं सर्वांत मोठी ओपनिंग केली. दुसऱ्या नंबरवर अक्षय कुमारच्या केसरी सिनेमानं २१.०६ कोटी रूपये पहिल्या दिवशी कमावले. त्यानंतर रणवीर सिंहचा गली बॉय सिनेमानं पहिल्या दिवशी १९.४० कोटींचं कलेक्शन केलं. आता पुढील महिन्यातच सलमान खानचा 'भारत' हा सिनेमा प्रदर्शित होणार असून तो हे सगळे रेकॉर्ड मोडीत काढतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

'स्टुडंट ऑफ द इयर-२' हा सिनेमा एका कॉलेज प्रेम कथेवर बेतलेला आहे. जर आपल्याला हलकी-फुलकी रोमांटिक फिल्म आवडत असलेत तर तर आपल्यासाठी हा सिनेमा हा चांगला ऑप्शन आहे. या सिनेमातील कास्टिंगचा विचार केल्यास यामध्ये टायगर श्रॉफसह अनन्या पांडे आणि तारा यांनी देखील आपल्या भूमिका चोखपणे बजावल्या आहेत. रोमांटिक, डान्स अथवा इतर अभिनय या सगळ्यामध्ये प्रत्येकाने जीव ओतून काम केलं आहे. 

अनन्या पांडेचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमातून अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अनन्यानं देखील पहिल्या सिनेमाच्या दृष्टीकोनातून खूप जबरदस्त एक्टिंग केली आहे. तर यासोबत ताराने देखील चांगलं काम केलं आहे.  त्यासोबतच सिनेमात मानवची भूमिका करणारा आदित्य सीलची बॉडी, एक्शन सीन्स आणि एक्टिंगच्या बाबतीत टायगरवर भारी पडला आहे. दुसरीकडे आदित्य सील याने देखील चांगला अभिनय केला आहे. अनेकदा तर तो टायगरवर भारी पडला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
SOTY 2: स्टुडंट ऑफ द इयर-२ ची बॉक्स ऑफिसवर हाफ सेन्चुरी Description: Student of the year 2 box office: टायगर श्रॉफचा स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसापासून सलग पाचव्या दिवसापर्यंत या सिनेमानं चांगली कमाई केली आहे.
Loading...
Loading...
Loading...