'स्टुडंट ऑफ द इयर-२'ची  चार दिवसात 'एवढी' कमाई 

बी टाऊन
Updated May 14, 2019 | 16:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Student of the year 2 box office collection: टायगर श्रॉफचा 'स्टुडंट ऑफ द इयर-२' हा सिनेमा गेल्या चार दिवसात चांगली कमाई करत आहे. या सिनेमातून अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 

soty_2_twitter
'स्टुडंट ऑफ द इयर-२'ची  चार दिवसात 'एवढी' कमाई  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: टायगर श्रॉफचा सिनेमा 'स्टुडंट ऑफ द इयर-२' प्रेक्षकांना चांगलाच आवडल्याचं सध्या दिसत आहे. प्रेम-मैत्री-डान्स या सगळयाचा संपूर्ण पॅकेज असलेल्या या सिनेमाने मागील ४ दिवसात चांगली कमाई केली आहे. हा सिनेमा खूप जबरदस्त कमाई करतोय असं नाही पण त्याची कमाई फार वाईट देखील नाही. या सिनेमाने पहिल्या दिवशी १२.०६ कोटींची कमाई केली आहे. या हिशोबाने हा सिनेमा टायगर श्रॉफच्या करिअरमधील दुसरा मोठा सिनेमा आहे. 

याआधी त्याच्या बागी २ या सिनेमाने २५.१० कोटींची ओपनिंग मिळवून दिली होती. सिने अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 'स्टुडंट ऑफ द इयर-२' सिनेमाने जवळजवळ ५.५२ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने जवळजवळ ४४.३५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता लवकरच हा सिनेमा ५० कोटींच्या क्लबमध्ये जाणार आहे. 

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांचा विचार केल्यास २१.६० कोटींच्या कमाईसह 'कलंक' या सिनेमाने आतापर्यंत सर्वाधिक ओपनिंग केली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अक्षय कुमारचा 'केसरी' हा सिनेमा आहे. ज्याने पहिल्याच दिवशी २१.०६ कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर १९.०४ कोटींच्या कमाईसह गली बॉय हा सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण असं असलं तरी आता पुढील महिन्यातच सलमान खानचा 'भारत' हा सिनेमा प्रदर्शित होणार असून तो हे सगळे रेकॉर्ड मोडीत काढतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

'स्टुडंट ऑफ द इयर-२' हा सिनेमा एका कॉलेज प्रेम कथेवर बेतलेला आहे. जर आपल्याला हलकी-फुलकी रोमांटिक फिल्म आवडत असलेत तर तर आपल्यासाठी हा सिनेमा हा चांगला ऑप्शन आहे. या सिनेमातील कास्टिंगचा विचार केल्यास यामध्ये टायगर श्रॉफसह अनन्या पांडे आणि तारा यांनी देखील आपल्या भूमिका चोखपणे बजावल्या आहेत. रोमांटिक, डान्स अथवा इतर अभिनय या सगळ्यामध्ये प्रत्येकाने जीव ओतून काम केलं आहे. 

 

 

अनन्या पांडेचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमातून अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पहिल्याचा सिनेमात अनन्याने खूपच चांगला अभिनय केला आहे. तर यासोबत ताराने देखील चांगलं काम केलं आहे. दुसरीकडे आदित्य सील याने देखील चांगला अभिनय केला आहे. अनेकदा तर तो टायगरवर भारी पडला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी